Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैभव-पूजाची ‘लव एक्स्प्रेस’

By admin | Updated: May 6, 2016 01:36 IST

रुपेरी पडद्यावर तरुण पिढीला अपील होतील, अशा चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. असाच एक विषय जो तरुणाईला आवडेल त्या विषयावर ‘लव एक्स्प्रेस’ नावाचा

रुपेरी पडद्यावर तरुण पिढीला अपील होतील, अशा चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. असाच एक विषय जो तरुणाईला आवडेल त्या विषयावर ‘लव एक्स्प्रेस’ नावाचा एक नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘लव एक्स्प्रेस’मध्ये सहवासातून खुलणाऱ्या प्रेमाची अनोखी कहाणी साकारली जाणार आहे. वैभव तत्त्ववादी व पूजा सावंत ही फ्रेश जोडी ‘लव एक्स्प्रेस’च्या निमित्ताने एकत्र झळकणार असून, ‘दगडी चाळ’फेम दिग्दर्शक चंद्र्रकांत कणसे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर याचे लेखन संजय जमखंडी यांचे असून, चिनार-महेश यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे. प्रेमकथेचा अनोखा पैलू प्रेक्षकांना निश्चितच भावेल, असा विश्वास निर्माते गणेश हजारे यांनी व्यक्त केला. येत्या २५ मेपासून ‘लव एक्स्प्रेस’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.