संजय लीला भन्साली यांच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ असलेला चिमाजीअप्पा मराठमोळ्या वैभव तत्त्ववादी याने साकारला आहे. ‘बाजीराव मस्तानी’चा टिझर नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामध्ये वैभव आणि रणवीर सिंग यांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. याविषयी वैभव सांगतो, ‘संजय भन्सालींसारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा होता. संजय सर शूटिंगदरम्यानही सतत वेगवेगळे प्रयोग करतात. त्यांचे पॅशन आणि लहान मुलाप्रमाणे त्यांचा उत्साह बघायला मिळाला. याबरोबरच दीपिका पदुकोणचे सेटवरील कंपोझर आणि शांत राहून भूमिका साकारणे, रणवीर सिंगची एनर्जी, प्रियांका चोप्राचे प्रोफेशनॅलिझम वाखाणण्यासारखे आहे.’ टिझरमधील सीनबाबत वैभव म्हणाला, ‘‘बाजीराव माझ्या बाजूने सुरी भिरकावतात हा तो सीन आहे. तो आम्ही जवळपास दोन ते तीन दिवस शूट केला होता.’’ वैभवची हंटर, कॉफी आणि बरंच काही आणि आता शॉर्टकटमधून मराठीतील चॉकलेटबॉय अशी ओळख झाली आहे. या चॉकलेटबॉयला लढवय्या म्हणून कसे स्वीकारतात, याची उत्सुकता आहे.
वैभवचा चिमाजीअप्पा
By admin | Updated: July 23, 2015 03:18 IST