Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायक उत्कर्ष शिंदेने अंध मुलीला दिली गाण्याची संधी, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 12:41 IST

उत्कर्ष शिंदेच्या एक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

'बिग बॉस मराठी'मधून घराघरांत लोकप्रिय झालेला गायक, संगीतकार व अभिनेता म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे व त्याच्या खास लेखनशैलीने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. उत्कर्ष हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो व कामाबद्दलची माहिती तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच उत्कर्ष शिंदेच्या एक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

नुकतंच उत्कर्षने एका अंध मुलीमधील गाण्याची प्रतिभा ओळखून तिला गाण्याची संधी दिली. याबद्दल उत्कर्षने पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्याने लिहलं, "अंधारात माणसे धडपडतात अडखळतात. पण तू मात्र अंधाराला भेदून लख लाखणाऱ्या सूर्या सारखी एक एक सूर लावत होतीस. तुला दिसत जरी नसलं, तू फक्त अंधाराच पाहिलास हे जरी खर असलं, तरीही तूझे सुर त्यातील ऊर्जा वातावरण प्रकाश मान करतात. मी तुमची फैन आहे मला तुम्हाला भेटायचंय सर. मुंबई ते पुणे एकटी प्रवास करून मला भेटायला कार्यक्रम ऐकायला आलेली तू. बकगंधर्व रंगमंच्यावरील नेत्र हीन मुलांच्या रांगेत बसलेली तू. मला तुमच्या सोबत स्टेजवर गायचंय सर. ती तुझी ईच्छा तेव्हा त्या गर्दीत जरी हुकली तरीही तुझा आवाज सूर तू मला कॉल करुन ऐकवलास आणि तेव्हाच निश्चय केला तुझ्या आवाजात गाण मी रेकॉर्ड करणारच".

पुढे त्याने लिहलं, "रिकॉर्डिंग स्टूडियो, माईक, हेडफोन कधीच न पाहिलेली निरागस मुलगी जेव्हा स्टुडिओत येते आणि हाताने माइक टच करत अंदाज घेत पूर्ण गानं उत्तमरित्या एका प्रख्यात मुरलेल्या गायिके सारखे गाते तेव्हा बघणाऱ्याला अचंबित होतच, पण ऐकताना वाटतं सरस्वती कंठात वसते तर ती अशी वसते. मी लिहिलेल्या प्रतेक शब्दाला तू न्याय दिलास. मी संगीत बद्धकेलेल गीत मला जसे हवे तसेच तू गायलीस. आज तुझ्यासाठी गाण बनवताना वाटतं आपल्या कलेच सार्थक झालं हीच भावना मनात आहे. अर्चना तुझ्या स्वरानी माझं गाण मोठं नक्कीच झालं. खूप मोठी हो बाळा. हा भाऊ सदैव सोबत आहे". उत्कर्षच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट करत एका अंध मुलीची इच्छा पुर्ण केल्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी अभिनेता