Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफचा फोटो वापरुन त्यानं महिलेला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात

By admin | Updated: April 2, 2017 21:39 IST

डेटींग अ‍ॅपवर सैफ अली खानचा बनावट फोटो लावून एका ब्रिटीश व्यक्तिने एका महिलेची फसवणूक केली. अँटोनी राय, असे या व्यक्तिचे नाव.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 2 - डेटींग अ‍ॅपवर सैफ अली खानचा बनावट फोटो लावून एका ब्रिटीश व्यक्तिने एका महिलेची फसवणूक केली. अँटोनी राय, असे या व्यक्तिचे नाव. त्याने एना रो नामक महिलेला फसवले आहे. 44 वर्षांच्या अ‍ॅन्टोनीने टिंडर या डेटींग अ‍ॅपवर सैफचा फोटो लावला होता. हा फोटो पाहून एना त्याच्यावर अशी काही लट्टू झाली. अँटोनीने त्याच्या प्रोफाईलवर सैफ अली खानचा फोटो लावून एनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मी बिझनेसमॅन असून कामासाठी विदेशात फिरत असल्याची बतावणी करून तो एनाच्या जवळ आला. एना त्याचे रूप पाहून त्याच्यावर भाळली. तिने त्याला स्वत:बद्दल सगळे काही सत्य सांगितले. पण अँटोनीने केवळ तिचा फायदा घेतला. टिंडरवरच्या त्यांच्या प्रेमाला सहा महिने झाले. एनाने त्याना याचे सेलिब्रेशन करण्यासाठी भेटायला बोलावले. पण आईची तब्येत ठीक नाही म्हणून अँटोनीने ही भेट टाळली. त्यानंतर अँटोनी एनाला टाळू लागला. एनाला संशय आल्यावर तिने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली. याचे रिझल्ट समोर आले तेव्हा एनाला मोठा धक्का बसला. कारण प्रोफाईलवरचा अँटोनीचा फोटो खोटा होता. त्याचे लग्न आधीच झाले होते. मुलींना फसवण्यासाठी तो बॉलिवूड स्टार्सचे फोटो वापरून खोटे सोशल अकाऊंट बनवायचा. हे सगळे कळल्यानंतर एनाने अँटोनीला चांगलाच धडा शिकवायचे ठरले आहे. तर दुसरीकडे सैफने या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.