मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना ओळखले जाते. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवरही आपली छाप सोडली आहे. अनेक विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या उषा नाडकर्णींना चाहत्यांनी ‘खाष्ट सासू’ म्हणून पाहणे जास्त पसंत केले. अभिनयासोबतच उषा नाडकर्णी त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. उषा नाडकर्णी यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कटू अनुभव सांगितले.
उषा नाडकर्णी म्हणाल्या, "लताबाईंनी मध्ये फोन केला, 'मास्टरशेफ'च्या वेळी. त्या म्हणाल्या, 'उषा तुला किती प्रेम करतात गं लोक.' 'आपल्या मराठीत का नाही?' तर मी म्हटलं, 'बाई, मराठीत कामं मिळत नाहीत. मग उभ्या-उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे, ती तशी आहे म्हणून सांगायचं.''
''मला भीक मागायला शिकवली नाही...''पुढे त्यांनी एका कामाचा अनुभव सांगितला, "आतासुद्धा मी पुण्याच्या ज्वेलर्सची एक जाहिरात केली. तर तो मला म्हणाला, 'उषा ताई, तुम्ही काहीच मागितलं नाही माझ्याकडे.' त्यावर म्हटलं, 'मला भीक मागायला शिकवली नाही माझ्या आई-वडिलांनी. माझं काम करायचं आणि निघायचं. पॅकअप म्हटलं की निघायचं. मी थांबतही नाही.''
"ते म्हणाले, तिला घेऊ नको...""तर मला म्हणे दोघं जण आहेत आमच्या पुण्यातले, ते म्हणाले 'तिला घेऊ नको.' मी म्हटलं, 'मी काम केलंय का त्यांच्याबरोबर?' म्हणाले, 'नाही, तरी ते बोलले.' म्हणजे मी नक्की मोठी झालेली आहे. मोठ्या माणसांबद्दल नेहमी पाठून खूप बोलतात. नरेंद्र मोदींना बोलतात, पण तो माणूस काम करतो. ते लक्ष देत नाहीत.", अशा शब्दात उषा नाडकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Web Summary : Usha Nadkarni shared tough experiences in the Marathi film industry, revealing biases and challenges faced despite her popularity and talent. She emphasized her self-respect and work ethic.
Web Summary : उषा नाडकर्णी ने मराठी फिल्म इंडस्ट्री के अपने कड़वे अनुभव साझा किए, जिसमें उन्होंने लोकप्रियता और प्रतिभा के बावजूद पूर्वाग्रहों और चुनौतियों का सामना करने का खुलासा किया। उन्होंने अपने स्वाभिमान और कार्य नीति पर जोर दिया।