Join us

जोगवा ते गणवेश!

By admin | Updated: February 10, 2015 23:25 IST

मुक्ता बर्वे, किशोर कदम व स्मिता तांबे यांनी ‘जोगवा’ चित्रपट गाजवला होता. त्यानंतर मात्र त्यांनी एकत्र अभिनय केला नव्हता.

मुक्ता बर्वे, किशोर कदम व स्मिता तांबे यांनी ‘जोगवा’ चित्रपट गाजवला होता. त्यानंतर मात्र त्यांनी एकत्र अभिनय केला नव्हता. मात्र आता तीच त्रयी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मूळचा कॅमेरामन असलेल्या अतुल जगदाळेच्या ‘गणवेश’ चित्रपटात हे तिघे पुन्हा एकत्र काम करणार आहेत. अभिनयात कलात्मकता जोपासणारे हे तिघे आता कोणती नवी जादू करणार याविषयी उत्सुकता जास्त आहे.