Join us

'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:54 IST

आज महिलांनी अनेक क्षेत्रांत प्रगती केलेली आहे, तरीही कुटुंब, संस्कृती आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरेद्वारे मर्यादा लादल्या जातात. स्त्रियांना सक्षम करणे म्हणजे समाज सक्षम करणे. 

ठळक मुद्दे'उंच माझा झोका २०१८' पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झालाया पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील तारकांनी चारचाँद लावले

आज महिलांनी अनेक क्षेत्रांत प्रगती केलेली आहे, तरीही कुटुंब, संस्कृती आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरेद्वारे मर्यादा लादल्या जातात. स्त्रियांना सक्षम करणे म्हणजे समाज सक्षम करणे. पुरुषप्रधानसमाजात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात स्त्रियांनी सर्व मतभेदांचा आणि रूढी परंपरांनी जखडलेल्या समाजाचा सामना करत स्वतःसाठी, इतर स्त्रियांसाठी व समाजसुधारणेसाठी लढा दिला आणित्यांच्या उदात्त कार्याने एक ठसा उमटवला आहे. या स्त्रियांना सन्मानित करण्याचा 'झी मराठी' वाहिनीचा एक निष्ठावान प्रयत्न म्हणजे उंच माझा झोका पुरस्कार. यंदाचं हे या पुरस्कार सोहळ्याचं सहावंवर्ष, 'मी आता थांबणार नाही' हे ब्रीद वाक्य घेऊन हिरीरीने पुढे येऊन समाजसुधारणेसाठी तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. 

'उंच माझा झोका २०१८' पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील तारकांनी चारचाँद लावले. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने अंगावर काटा आणेल अशाप्रेरणादायी गाण्यांवर नृत्य सादर केले. अभिनेत्री सोनाली खरे आणि दीप्ती केतकर यांनी जुन्या आणि नव्या परंपरेची सांगड घालत एक सुंदर परफॉर्मन्स सादर केला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ आणिसध्याच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहण्यासाठी योगसाधना करणारी आजची पिढी यांची जुगलबंदी दीप्ती केतकर आणि सोनाली खरे यांना सादर केली. या व्यतिरिक्त या पुरस्कार सोहळ्यात सोनालीकुलकर्णी, किशोरी शहाणे, निर्मिती सावंत, मृणाल कुलकर्णी, सुलोचना चव्हाण, श्वेता मेहंदळे हे कलाकार तसेच मेधा पाटकर, स्नेहलता देशमुख हे मान्यवर उपस्थित होते. उंच माझा झोका पुरस्कार २०१८ चेसूत्रसंचालन प्रेक्षकांची लाडकी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते आणि आईआजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी केले.

टॅग्स :मृणाल कुलकर्णी