‘ये इश्क नहीं आसान, बस इतना समज लिजीए... इक आग का दर्या हैं, और डुब के जाना हैं...’ प्रेमात पडल्यावर सगळ्यांचीच सिच्युएशन काहीशी अशीच होते, असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीचे ते रोमँटिक दिवस अन् फुलत जाणारे प्रेम आणि त्या वेळच्या आठवणी आयुष्यभर आपल्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त होऊन जातात. अशाच सुंदर आठवणींमध्ये आपली ब्युटी क्वीन प्रिया बापट सध्या रमली आहे. ‘सीएनएक्स’सोबत प्रियाने तिच्या उमेशसोबतच्या डेटिंगच्या दिवसांना उजाळा दिला अन् ती त्या रोमँटिक दिवसांमध्ये अगदी हरवूनच गेली. प्रिया सांगतेय, उमेश, मी आणि माझी मैत्रीण आम्ही तिघे एकदा ट्रेनने प्रवास करीत होतो. मला गायची आवड होतीच अन् उमेश माझ्या गाण्यावर खूपच फिदा होता. तो नेहमी मला गायला लावायचा अन् मलाही त्याच्यासाठी गायला आवडायचे. जेव्हा आम्ही डेटिंग करायचो, त्या वेळी मस्त बाइकवरून लाँग ड्राइव्हला जायचो; मग त्या वेळेस मी मागे बसून त्याच्यासाठी खूप गाणी गायचे. त्या दिवशी आम्ही उमेशसोबत जेन्ट्स डब्यात चढलो होतो आणि त्याने मला चक्क तेथे गाणे गायला सांगितले. येथे कसे गाणे गायचे म्हणून मी त्याला नाही म्हणाले, तर हा महाशय चक्क मुलीला प्रपोज करताना जसे गुडघ्यावर बसतात, तसा ट्रेनमध्ये माझ्यासमोर हात जोडून गुडघ्यावर बसला अन् मला गाणे गायला सांगितले. ते काहीही असो; पण एकदम फिल्मी पद्धतीचा हा सीन उमेशने फक्त प्रियाचे गाणे ऐकण्यासाठी केला खरा; पण तिच्या हृदयात तो कायमचा कैद होऊन गेला.
प्रियासाठी उमेश बसला गुडघ्यावर
By admin | Updated: March 18, 2016 01:10 IST