Join us  

मांसाहार करणारी माणसं अशुद्ध आहेत का? ट्विंकल खन्नाचा सवाल! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:14 PM

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या भेदावर तिचं मौन सोडलंय. काय म्हणाली ट्विंकल? बघा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चर्चेत असते. ट्विंकल आसपासच्या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर तिची परखड मतं व्यक्त करत असते. अशातच ट्विंकलने शाकाहारी आणि मांसाहारीबद्दल एक ट्विट केलंय जे चर्चेत आहे. मांसाहार करणारी माणसं अशुद्ध असतात का? असा सवाल ट्विंकलने विचारलाय. 

काही दिवसांपुर्वी एका प्रसिद्ध फूड कंपनीने शुद्धा शाकाहारी जेवणासाठी कर्मचाऱ्यांना हिरव्या रंगाचा ड्रेस कोड दिला होता. त्यावर निशाणा साधत ट्विंकल म्हणाली, "अवतरण चिन्हात शुद्ध शाकाहारी लिहिल्याने असं वाटतं की जे मांसाहार करतात ती माणसं योग्य नाहीत. शाकाहाराला प्रोत्साहन देण्याचा उद्देश यात कमी असून मांसाहाराला कमी लेखण्याचा इथे प्रयत्न होतो."

ट्विंकल पुढे लिहिते, "शाकाहारी लोकांना प्राधान्य देण्यासाठी फूड कंपनीचा हा चांगला उद्देश असेल. पण असं जरी असलं तरीही या गोष्टीतून स्पृश्य-अस्पृश्य सारखे प्रकार वाढीस लागण्याची शक्यता आहे." तुम्हा सर्वांना माहित आहे की, एका प्रसिद्ध फूड कंपनीने शुद्ध शाकाहारी जेवण डिलिव्हरी करणाऱ्या माणसांना हिरव्या रंगाचा ड्रेस कोड दिला होता. पण लोकांच्या विरोधामुळे कंपनीने हा निर्णय मागे घेतला.

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारझोमॅटोस्विगीअन्न