Join us  

रुबिना दिलैकने दिली गुडन्यूज! लग्नाच्या पाच वर्षांनी 'छोटी बहू' होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:41 AM

रुबिनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ती आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.

‘छोटी बहू’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुबिना दिलैक. ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘इश्क मे मरजावा’, ‘नमक इश्क का’, ‘सास बिना ससुराल’, ‘तू आशिकी’ अशा अनेक मालिकांमध्ये रुबिनाने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुबिना गरोदर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही फोटोंमध्ये रुबिनाचं बेबी बंप दिसलं होतं. त्यानंतर ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता खुद्द रुबिनानेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ती आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.

रुबिनाने पती अभिनव शुक्लाबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रुबिनाने बेबी बंपही फ्लाँट केलं आहे. रुबिना आणि अभिनव लवकरच आईबाबा होणार आहेत. छोट्या पाहुण्याला वेलकम करण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत. रुबिनाने या फोटोंना “आम्ही आता एकत्र जगाची सफर करू. आम्ही डेट करण्यापासून लग्न केल्यानंतर आता एक कुटुंब म्हणून जग फिरू. छोट्या ट्रॅव्हलरला वेलकम करत आहोत,” असं कॅप्शन दिलं आहे.

रुबिना आणि अभिनव शुक्लाने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस १४’मध्ये ते दोघं सहभागी झाले होते. या पर्वाची रुबिना विजेतीही ठरली होती. रुबिना आणि अभिनव घटस्फोट घेत विभक्त होण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, ‘बिग बॉस’मुळे त्यांच्यातील वाद मिटले आणि त्यांनी वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आईबाबा होणार असल्यामुळे ते आनंदी आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस १४प्रेग्नंसीसेलिब्रिटी