Join us  

या अभिनेत्रीला इंटिमेट सीन्स देणे पडले महागात, दोन महिन्यात मोडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:22 AM

‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ फेम अभिनेत्रीचा साखरपुडा मोडल्याची खबर आहे.

ठळक मुद्देराहुल सराफ याच्याशी साखरपुडा करण्यापूर्वी गरिमा अभिनेता विवियन डिसेनासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ फेम गरिमा जैन हीचा साखरपुडा मोडल्याची खबर आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत खुद्द गरिमाने याबाबबत माहिती दिली. हा साखरपुडा तुटण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. त्याचे झाले असे की, गरिमाचे एका मालिकेत इंटिमेट सीन्स दिलेत. या इंटिमेट सीन्समुळे गरिमाचा भावी पती राहुल सराफ याने चक्क साखरपुडा तोडला. 13 जून 2019 ला गरिमा व राहुल सराफ यांचा साखरपुडा झाला होता. मात्र राहुलला गरिमाने मनोरंजन क्षेत्रात काम करणे आवडत नव्हते. यावरून गरिमा आणि राहुल यांच्यात सतत वाद होत होते त्यामुळे अखेरीस त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

अलीकडे बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गरिमाने या वृत्ताला दुजोरा दिला. माझ्यामते, आम्ही घाईघाईत हे नाते तोडले. रोका सेरेमनीनंतरच आमच्यात वाद होत होते. कदाचित दोघांचेही वेगवेगळे क्षेत्र त्याचा कारणीभूत होते.मी मालिकेत इंटीमेट सीन्स देणे  राहुलला मान्य नव्हते. मी स्क्रिनवर छोटे कपडे घालणे यालाही त्याचा विरोध होता. माझ्या मॉडर्न कपड्यांवरही त्याला आक्षेप होता. हे नाते टिकवण्याचे बरेच प्रयत्न करूनही शेवटी गोष्टी आणखी बिघडत गेल्या आणि अखेर आम्ही साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला, असे गरिमाने सांगितले.

या घटनेनंतर आता गरिमा पूर्णपणे आपल्या करिअरवर फोकस करू इच्छिते. सध्या माझा लग्नाचा कुठलाही इरादा नाही, असेही तिने या मुलाखतीत सांगितले. गरिमाने 2015 साली ‘दोस्ती यारियां मनमर्जिया’ या मालिकेद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सध्या ती ‘श्रीमदभागवत महापुराण’ या मालिकेत देवी इंद्राणीची भूमिका साकारते आहे.

राहुल सराफ याच्याशी साखरपुडा करण्यापूर्वी गरिमा अभिनेता विवियन डिसेनासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत तिने विवियनच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

टॅग्स :विवियन डसेनाटेलिव्हिजन