Join us

"ट्युबलाईट"चा ट्रेलर रिलीज, ओम पुरींचा अखेरचा आवाज

By admin | Updated: May 25, 2017 21:56 IST

अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 -  अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 
‘ट्युबलाईट’च्या ट्रेलर रिलीजसाठी अभिनेता सलमान खान, सोहेल खान आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान एकत्र आले होते. यावेळी सलमानने दिवंगत अभिनेते ओम पुरी, रिमा लागू आणि विनोद खन्ना यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सलमान भावूक झालेला पाहायला मिळाला. ‘ट्युबलाईट’ हा चित्रपट ओम पुरी यांचा अखेरचा असून त्यांचे काही काही दिवसांपूर्वीच हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून ओम पुरी यांचा अखेरचा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. 
‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. तर, सलमानच्या आधीच्या सुपर-डुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेला दिग्दर्शक कबीर खानने ‘ट्युबलाईट’चेही दिग्दर्शन केले आहे. कबीर खान आणि सलमान खान या जोडगोळीचा हा तिसरा चित्रपट आहे. तसेच, चित्रपट यंदा ईदच्या दिवशी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.