Join us

सखीचा लूक चेंज

By admin | Updated: April 22, 2016 01:40 IST

कोणत्याही कलाकारांना त्यांच्या पर्टिक्यूलर भूमिकेसाठी एक लूक कॅरी करावा लागतो. जसे त्यांचे कॅरेक्टर असते तसाच पेहराव करून प्रेक्षकांसमोर यावे लागते.

कोणत्याही कलाकारांना त्यांच्या पर्टिक्यूलर भूमिकेसाठी एक लूक कॅरी करावा लागतो. जसे त्यांचे कॅरेक्टर असते तसाच पेहराव करून प्रेक्षकांसमोर यावे लागते. मग काही वेळेस या कलाकारांची खरी ओळख पुसली जाऊन प्रेक्षक त्यांना त्याच भूमिकेत पसंत करू लागतात अन् त्याच नावाने ओळखूही लागतात. आपल्याला आवडणारी हीरोईन ही खऱ्या आयुष्यात पण अशीच आहे असेच जणू काही त्यांना वाटू लागते. मग एखाद्या भूमिकेत अडकून न राहता आपणही व्हर्सटाइल अ‍ॅक्टर आहोत अन् कोणतीही भूमिका किंवा लूक आपण कॅरी करू शकतो, यासाठी मग कलाकारांना मेकओवरच करावा लागतो. आता पाहा ना, एका मालिकेमध्ये अगदी सोज्वळ सलवार-कमीजमध्ये दिसणारी आपली सिंपल ब्युटी सखी गोखले ही मात्र रीअल लाइफमध्ये फार मॉडर्न आहे. असे आम्ही नाही तर सखीचे सध्या सोशल साइट्सवर रिवील होणारे फोटोच सांगतात. मॉडर्न लूकमध्ये सखी अतिशय झक्कास दिसते. तिचा नुकताच साडीतील एक फोटो सध्या सोशल साइट्सवर व्हायरल होत असून, यामध्ये तिचा अतिशय डिफरंट लूक दिसत आहे. सखी या फोटोत ग्लॅमरस दिसत असून तिच्या या इंडो-वेस्टर्न स्टाइलला तिचे चाहते लाइक करीत आहेत.