Join us

Troll: शिल्पा शेट्टीचा 'हा' फोटो होतोय व्हायरल,तर यूजर्सनी म्हटले,‘या वयात तुला हे शोभतं काय?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 08:00 IST

प्रत्यक्ष जीवनातही कायमच ग्लॅमरस दिसणारी शिल्पाचा एक फोटो समोर आला आहे. मात्र हा फोटो आताचा नसून सप्टेंबर 2017 चा आहे.

तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय... तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मोठ्या मानाने मिरवलं आहे. लग्नानंतर मात्र शिल्पा शेट्टी आपल्या संसारात आणि मुलामध्ये बिझी झाली. तरीही तिचे सिनेमावरील प्रेम काही कमी झालं नाही. त्यामुळे लग्नानंतरही सिनेमा आणि विविध रिअॅलिटी शोच्या माध्यमातून शिल्पा रसिकांच्या भेटीला येत असते. सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळे आणि  फिटनेस व्हिडीओमधूनही शिल्पाचं दर्शन रसिकांना होत असतं. आजही शिल्पाची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर असतात.प्रत्यक्ष जीवनातही कायमच ग्लॅमरस दिसणारी शिल्पाचा एक फोटो समोर आला आहे. मात्र हा फोटो आताचा नसून सप्टेंबर 2017 चा आहे. शिल्पाचा हा जुना फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.तर दुसरीकडे हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या फोटोत शिल्पाने कुर्ता परिधान केला असून खाली पायजामा मात्र घातलेला नाहीय.त्यामुळे शिल्पा पायजामा घालायला विसरली की काय अशा कमेंटस तिच्या या फोटोला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.   

शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे.ते म्हणजे ती लवकरच रेडिओवर पदार्पण करणार आहे. ती महाभारतातील द्रौपदीच्या पात्राला आवाज देणार आहे. शिल्पा म्हणाली की बालपणी आपल्याला टेलिव्हिजनवर फक्त बी.आर. चोप्रा यांची महाभारत मालिका बघण्याचीच संधी होती.

माझी नेहमीच अध्यात्माकडे ओढ असते. द्रौपदी खूप सुंदर व आयकॉनिक भूमिका आहे आणि मी खूप खूश आहे कारण त्या पात्राला माझा आवाद देत आहे. हे चित्रपटापेक्षा खूप वेगळे काम आहे. कारण मी फक्त डबिंगमध्ये सहभागी असणार आहे. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव ठरणार आहे. शिल्पा जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईकडून तिला महाभारत मालिकेबद्दल समजले होते. शिल्पा द्रौपदीच्या वस्त्रहरण दृश्यावेळी रडायला लागली होती. ती म्हणाली की आता माझ्या मुलाने पांडव व कौरवांच्या कथा ऐकाव्यात. ज्याप्रकारे मी ऐकत मोठी झाले आहे. शिल्पाला अध्यात्माबद्दल आसक्ती असून ती तिच्या सहा वर्षांचा मुलगा वियानला महाकाव्य आणि पौराणिक कथा सांगत असते.

टॅग्स :शिल्पा शेट्टी