Join us

Trending: 'मैंने प्यार किया'च्या भाग्यश्रीने शेअर केला चक्क बेड सेल्फी, पाहून चाहते देतायेत अशा कमेंटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 18:26 IST

Bhagyashree of 'Maine Pyaar Kiya' shared Bed Selfieभाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

नव्वदीच्या दशकातला सुपरडुपर हिट सिनेमा 'मैने प्यार किया' मधील भाग्यश्री आजही चाहत्यांची तितकीच फेव्हरेट आहे.  'मैने प्यार किया' या सिनेमातून  झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली. 1989 साली ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली. सिनेमातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन सिनेमा केलेत आणि यानंतर, अभिनयातून ब्रेक घेतला. 'मैने प्यार किया' रिलीजवेळी भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.

भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच असतो.

रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या  फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. भाग्यश्री नुकताच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भाग्यश्रीने बेडवर निवांत बसली असून पतीसोबत पोज देताना दिसत आहे.  भाग्यश्री या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खूप सुंदर, परी अशा कमेंट्स भाग्यश्रीच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी केल्या आहेत. 

टॅग्स :भाग्यश्री