Join us  

अभिषेक बच्चन आणि संयमी खेरच्या 'घूमर'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 2:04 PM

अखेर प्रतीक्षा संपली असून घूमर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे.

अखेर प्रतीक्षा संपली असून घूमर (Ghoomer Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. प्रेक्षकांना घूमरमध्ये प्रेरणादायी कथा पाहायला मिळणार आहे. घुमरच्या टीझर आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री संयमी खेर (Saiyami Kher) यांच्या दमदार भूमिका घूमर मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील स्पोर्ट्स चित्रपटाच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे.

घूमर चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येते आणि जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडूला ट्रेन करताना दिसतोय जी भूमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे. पुन्हा एकदा र्दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

आर. बाल्कींच्या अनोख्या शैलीतून घुमरची गुंफलीय कथा

अभिषेक आणि संयमीचा दमदार परफॉर्मन्स त्यांच्या मनातील वेदना, खेळासाठी दृढनिश्चय आणि आशा अनेक लक्षवेधी क्षणाची पर्वणी यातून अनुभवयाला मिळणार आहे.  दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या अनोख्या शैलीतून घुमरची कथा गुंफली गेली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचं कळतंय. घूमर हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय चित्रपट असून त्यांनी चीनी कम, पा आणि पॅड मॅनसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे.

'घूमर'मध्ये अभिषेक बच्चन आणि संयमी खेर यांच्याव्यतिरिक्त शबाना आझमी आणि अंगद बेदी देखील यात अनोख्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात एक ट्विस्ट म्हणून दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची खास एंट्री असणार आहे. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास यांच्याही या चित्रपटातून पदार्पण होत आहे. आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित घूमर १८ ऑगस्ट, २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :अभिषेक बच्चनसंयमी खेर