Join us

अजयच्या चित्रपटात टायगर

By admin | Updated: September 24, 2014 06:26 IST

नवोदित अभिनेता टायगर श्रॉफने यापूर्वी अजय देवगणसोबत काम करायला नकार दिला होता.

नवोदित अभिनेता टायगर श्रॉफने यापूर्वी अजय देवगणसोबत काम करायला नकार दिला होता. दोन हीरो असलेल्या चित्रपटाची आॅफर मिळाल्याने टायगरने अजयला नकार दिला होता. आता मात्र अजयने टायगरला घेऊन आणखी एक चित्रपट प्लान केला आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत असेल, तर अजय या चित्रपटाचा निर्माता आहे. ‘हिरोपंती’मधील जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे टायगरला सध्या अनेक चांगल्या चित्रपटांच्या आॅफर्स मिळत आहेत. अजयने त्याच्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरवलेले नाही, तसेच हिरोईनचीही निवड झालेली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा करणार असल्याचे कळते.