Join us

Throwback : हा अभिनेता होता करिना कपूरचा बेस्ट फ्रेंड, रात्री कितीही वाजता फोन करून मारायचे गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:00 IST

करिनाने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

ठळक मुद्देकरिना कपूर आणि शाहिद कपूर हे एकमेकांच्या प्रेमात पडण्याच्याआधी ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. करिनानेच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते.

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांची प्रेमकथा काही वर्षांपूर्वी मीडियात चांगलीच गाजली होती. त्यांनी देखील त्यांचे प्रेमप्रकरण कधी लपवून ठेवले नाही. मीडियातील मुलाखतींमध्ये ते एकमेकांविषयी भरभरून बोलायचे. एवढेच नव्हे तर कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे ते आता लवकरच लग्न करणार असे सगळ्यांना वाटत होते. पण जब वी मेट हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली. सुरुवातीला तर हा एखादा पब्लिसिटी स्टंट असल्याचे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण काहीच काळात त्यांचे खरेच ब्रेकअप झाले असल्याचे सगळ्यांना कळले.

करिना कपूर आणि शाहिद कपूर हे एकमेकांच्या प्रेमात पडण्याच्याआधी ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. करिनानेच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. करिनाने 2004 ला दिलेल्या एका मुलाखतीत शाहिद आणि तिच्या मैत्रीविषयी सांगिते होते की, शाहिद आणि माझी खूप चांगली मैत्री असून आमची मैत्री अनेक वर्षं अशीच टिकून राहील. आमची मैत्री इतकी घट्ट आहे की, मी उदास असेन किंवा माझा दिवस वाईट गेला असेल तर मी त्याला रात्री 12.30 ला देखील फोन करते. चित्रीकरणाच्यावेळी एखादा सीन चांगला होत नसेल तरी मी त्याला त्याविषयी सांगते. तो एक अभिनेता असल्याने तो मला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतो. त्याच्यासोबत गप्पा मारायला, त्याच्यासोबत गोष्टी शेअर करायला मला खूप आवडतात.

शाहिद आणि करिना यांच्या ब्रेकअपला आता अनेक वर्षं झाले असून ते आपआपल्या संसारात खूश आहेत. करिनाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसोबत झाले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे.

तर शाहिदचे लग्न मीरा राजपूत सोबत झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून शाहिदची पत्नी बॉलिवूडशी संबंधित नसली तरी ती अनेक पुरस्कार सोहळ्यांना, कार्यक्रमांना त्याच्यासोबत आवर्जून हजेरी लावते. 

टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूरसैफ अली खान मीरा राजपूत