Join us

"हे एक वेगळं जग आहे...", अभिनेत्री श्रेया बुगडेनं राणीच्या बागेला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:51 IST

Actress Shreya Bugde : श्रेया बुगडेने राणीच्या बागेत फेरफटका मारतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री श्रेया बुगडे (Actress Shreya Bugde) मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून रसिकांना खळखळून हसविले आहे. या शोमधून घराघरात पोहचली आहे. नुकतेच तिने मुंबईतील राणीच्या बागेला भेट दिली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिचा अनुभव शेअर केला आहे.

श्रेया बुगडेने राणीच्या बागेत फेरफटका मारतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने लिहिले की, आजपर्यंत राणीबाग म्हटलं की लहान मुलांसाठी एक पिकनिकचं ठिकाण एवढंच चित्र डोक्यात यायचं. माझ्या ही डोक्यात असंच होतं. पण नुकत्याच काही दिवसापूर्वी मी ‘मुंबई झू’ म्हणजे राणीबागेला भेट दिली. मी खरंच खूप अचंबित होते अशा अनेक गोष्टी पहायला मिळाल्या.

आपण नेहमी म्हणतो परदेशात असणाऱ्या गोष्टींसारख्या गोष्टी आपल्या इथे भारतात सुद्धा असायला हव्या. तशाच आणि त्याहून अधिक चांगल्या दर्जाच्या गोष्टी मला राणीबागेत पाहायला मिळाल्या…मुंबई म्हणजे सारखी धावपळ आणि ट्रॅफिक. पण या ठिकाणी गेल्यावर समजतं हे एक वेगळं जग आहे…वेगवेगळे पक्षी, प्राणी, सुंदर असा निसर्ग हे सगळं एक वेगळा अनुभव देऊन जातं…मुंबईचे नागरिक म्हणून तर आपण या उपक्रमाला आवर्जून भेट दिलीचं पाहिजे…आणि फक्त मुंबईकर नव्हे तर सर्व देशातील व राज्यातील पर्यटकांनी एकदा तरी इथे भेट द्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत नक्की जा खुप धमाल आणि मजा करायला मिळेल, असे तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :श्रेया बुगडे