Join us

विचारवंत आणि संवेदनशील

By admin | Updated: November 4, 2014 08:57 IST

अभिनेता हा अभिनय करत असला तरी त्याच्यातही एक माणूस दडलेला असतो.

अभिनेता हा अभिनय करत असला तरी त्याच्यातही एक माणूस दडलेला असतो. त्यालाही समाजमन असते. सदाशिव अमरापूरकर हे याच जातकुळीतले! अभिनय हा त्यांचा जीव की प्राण. रंगभूमीवरून आले असल्याने प्रत्येक ‘शॉट’मध्ये ‘जान’ देणारा हा कलावंत विरळाच. मात्र, शॉट संपला की एखादे पुस्तक हातात घेऊन ते कोपऱ्यात जाऊन बसत. त्या वेळी ते एकदम सिधेसाधे भासत. मात्र, शॉट सुरू होताच त्यांची देहबोली, आवाज, डोळे एकदम बदलून जात. त्यांच्यातल्या कलावंतासह त्यांचे संवेदनशील मनही सदैव जागे असे. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी सर्वांत प्रथम त्यांनीच अण्णांची बाजू उचलून धरली होती. सामाजिक उपक्रमात ते सक्रिय असत. नगरच्या वस्तुसंग्रहालयासाठी त्यांनी काही लाख रुपये दिले होते; पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी असल्याने त्यांच्यात एक तटस्थताही दिसून येई. त्यांना जे योग्य वाटेल तेच मत ते निर्भीडपणे मांडत. पुणे विद्यापीठात इतिहास घेऊन ते एम.ए. झाले होते.