Join us  

या 'भारतीय' महिलांना सोशल मीडियावर आहे लाखोंचे फॅन फॉलोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 12:22 PM

आज आपण अशाच सूत्रसंचालक महिलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

ठळक मुद्देसध्या सोशल मीडियाचा जमाना असून, देशातील सर्वाधिक तरुण वर्ग सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अनेकांना एका रात्रीत स्टार बनवण्यासाठीदेखील हे माध्यम कारणीभूत ठरले.आज आपण अशाच सूत्रसंचालक महिलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

मुंबई : सध्या सोशल मीडियाचा जमाना असून, देशातील सर्वाधिक तरुण वर्ग; तसेच सर्वच वयोगटातील नागरिक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दिवसांगणिक ही संख्या वाढतच आहे. गेल्या आठवड्यात इन्स्टाग्राम इंडियाने भारतीय कर्णधार विराट कोहलीला ‘मोस्ट एंगेज्ड अकाऊंट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तर प्रिया वारीअरला एका रात्रीत स्टार बनवण्यासाठी देखील हेच माध्यम कारणीभूत ठरले. त्याचप्रमाणे महिला निवेदिका क्रिकेट सामन्यामध्ये समालोचन करतात त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे.  आयपीएलला क्रिकेटसोबतच ग्लॅमर आणि मनोरंजनाचा तडका असल्याने स्पर्धेची लोकप्रियता प्रचंड आहे. ज्यांना विश्लेषण ऐकण्याचा कंटाळा येत होता ते आता या अँकर्समुळे विश्लेषण ऐकायला आणि बघायलाही लागले आहेत. क्रिकेट क्षेत्रात समालोचन आणि सूत्र संचालनात पुरूषांची मक्तेदारी मोडून काढत आयपीएलमधून आपल्याला ग्लॅमरस सूत्रसंचालिका देखील पाहायला मिळाल्या. आज आपण अशाच सूत्रसंचालक महिलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. बघुया त्यात काही भारतीय आहेत तर काही विदेशातील आहेत.

१) अर्चना विजया

भारतीय क्रिकेट विश्वातील एक उत्तम निवेदक म्हणून अर्चना विजया आज  घराघरात ओळखीचा चेहरा बनली आहे. सौंदर्यासोबतच एक उत्तम मॉडेल, आकर्षक व्हीजे आणि फिटनेस फ्रिक तरूणी म्हणून अर्चना विजयाने स्वत:ची ओळख बनवली आहे. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ या प्रतिमेत ती अगदी फिट बसते. सुत्रसंचालनाच्या वेगळ्या शैलीमुळं आणि ग्लॅमर्समुळं अर्चना विजयाला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अर्चनाने टूर डायरी फॉर एक्स्ट्रा कव्हर’ आणि ‘क्रिकेट मसाला मार के’ हे शो होस्ट केले आहे. अर्चना आयपीएलच्या यंदाच्या सत्रामध्ये मैदानावर सुत्रसंचालन करताना बघायला मिळू शकते. 

२) रॉशल राव 

मनोरंजन क्षेत्राबरोबरच सुत्रसंचालकांमध्ये रॉशल रावचे नाव चर्चेत असते. मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर रॉशलच्या करिअरला नवी दिशा मिळाली. रॉशल रावने फेमिना मिस इंडियामध्ये जेतेपदही पटकावलं आहे. रॉशल रावने क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचन केलं आहे.  रॉशल रावचे सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या एका पोस्टला कोटींमध्ये लाईक मिळतात. 

३) मयंती लंगर 

आयपीएलआधी विश्वचषकामध्ये मयांती लंगर ही ग्लॅमरस महिला क्रीडा पत्रकार स्टुडियोमध्ये दिग्गज समालोचकांना प्रश्न विचारताना चर्चेत दिसायची.  मयंतीबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या ‘ब्युटी विथ ब्रेन’ व्यक्तिमत्त्वामुळे ती कमी कालावधीत सर्वांमध्ये लोकप्रिय झाली. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटला मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटीझन्स आपली प्रतिक्रिया देत असतात. 

४) शिबानी दांडेकर

आयपीएल सामन्यांच्या वेळी मैदानाच्या सीमारेषेपलीकडे उभी राहून धमाल निवेदन करणारी मराठमोळी शिबानी दांडेकर आज घराघरात पोहचली आहे. चित्रपट आणि शोमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या शिबानीला आज प्रत्येकजण ओळखतो. गायिका, अभिनेत्री, निवेदिका, मॉडल अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ती भारतीय मनोरंजन क्षेत्रात दिसून येते. त्यामुळं शिबानीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. शिबानी  इन्स्टाग्रामवर सतत पोस्ट टाकत असती आणि चाहतेही त्यावर आपली प्रतिक्रिया देतात. कामानिमित्त ती सतत देश-परदेशात फिरत असते, भ्रमंतीवर असते. त्यामुळे ती त्यादरम्यानचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. 

५) इसा गुहा 

2001 मध्ये इसाने इंग्लंडच्या महिला संघामध्ये स्थान मिळवत क्रीडा विश्वात प्रवेश केला. इसाने आपल्या खेळाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  इंग्लंड संघातून बाहेर पडल्यानंतर इसाने निवेदिकाच्या भूमिकेमध्ये आपलं नवं करिअर सुरु केले.  क्रिकेट आणि नंतर  अँकरिंगमध्ये आपला जलावा दाखवणाऱ्या इसाचा सोशल मीडियावर मोठा फॉलोअर्स आहे. 

६) ईशा गुप्ता 

जन्नत २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री इशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. कधी बोल्ड लूकमुळे तर कधी नेटकऱ्यांना दिलेल्या बेधडक उत्तरामुळे ती प्रकाशझोतात आल्याचे पाहायला मिळाते. ईशा गुप्ताच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक मिळतात. 

७) सनी लिओनी

इंडो कॅनेडियन अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करण्यात ती कायम व्यस्त असते. सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्टना चाहत्यांचा प्रतिसाद असतो. भारतीय क्रिकेटशी तिचा तसा काही थेट संबंध नाही. पण सोशल मीडियवरील तिचे फॅन फॉलोअर्स हे तिच्या यशाची पावती देतात. 

८) बानी जे.

तरुणाईमध्ये बानी जे. या नावाने प्रसिद्ध असलेल्या व्ही. जे बानीचे खरं नाव ‘गुरबानी जज’ आहे. एक फिटनेस मॉडल,  अभनेत्री आणि निवेदिका म्हणून बानी कायम आपल्याला भारतीय माध्यमांमध्ये दिसते . 2016 मध्ये बानी जे बिग बॉसमध्ये सहभागी होती. यामध्ये तीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.  याशिवाय एमटीव्ही रोडीज् आणि खतरों के खिलाडी या कार्यक्रमातही बानीचा सहभाग होता. बानीच्या  फिटनेस आणि टॅटूची दुनिया दिवानी आहे. बानी सोशल मीडियावर सतत काहीना काही पोस्ट करत असते.  सोशल मीडियावरील बानीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. त्यामुळे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेल्या भारतातील महिलांमध्ये तिचे नाव येते. 

टॅग्स :आयपीएल २०२३सनी लिओनीइशा गुप्ताइन्स्टाग्रामआयपीएल 2018