एकाच वेळी टीव्ही शो आणि चित्रपट असे दोन्ही काम करणा-या एकता कपूरची या कामासाठी नेहमीच प्रशंसा केली जाते, जेव्हा तिला आॅस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘का नाही. माझा चित्रपट जर आॅस्करसाठी पाठवण्यात आला, तर मला नक्कीच आवडेल, पण माझे चित्रपट आॅस्करसाठी नसतात. आॅस्करचा विचार करून चित्रपट बनवत नाही, तर प्रेक्षकांचा विचार करून मी चित्रपट बनवत असते. त्यावर परीक्षक काय म्हणतात याची मला पर्वा नसते. जर चॅनल, प्रेक्षक आणि माझ्यासोबत काम करणारे लोक खुश आहेत, तर मलाही त्याबाबत आनंद होतो.’ एक ताची नवी मालिका अजीब दास्ता हैं ये नुकतीच एका चॅनलवर सुरू झाली आहे.
आॅस्करसाठी माझे चित्रपट नाहीत
By admin | Updated: October 9, 2014 23:46 IST