Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्री पडली मराठी गाण्याच्या प्रेमात, 'गुलाबी साडी'वर आजीसह केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:01 IST

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा गुलाबी साडी गाण्यावर डान्स, आजीदेखील थिरकली

सध्या ट्रेंडिंगचा जमाना आहे. सोशल मीडियावर रोज काही ना काही ट्रेंड सुरू असतात. इन्स्टाग्रामवर अनेक गाणी व्हायरल होत असतात. सध्या जिकडेतिकडे 'गुलाबी साडी' गाण्याची हवा पाहायला मिळत आहे. हे गाणं प्रचंड व्हायरल झालं असून इन्स्टाग्रामवर या गाण्याच्या रील अनेक रील्सही पाहायला मिळत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून रेमोपर्यंत अनेकांनी गुलाबी गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्रीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अदाचं मराठी प्रेम काही लपून राहिलेलं नाही. तिचे मराठी कवितांचे व्हिडिओही व्हायरल होतात. आता अदा 'गुलाबी साडी' गाण्याच्या प्रेमात पडली आहे. या गाण्यावर तिने आजीसह रील व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत अदाची आजी 'गुलाबी साडी' नेसून डान्स करताना दिसत आहे. "ही माझी आजी आहे. ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी. ती माझी real life हिरो आहे," असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. अदाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, सध्या अदा तिच्या 'बस्तर' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिने आयपीएस अधिकारी नीरजा माधवन ही भूमिका साकारली आहे. 'द केरला स्टोरी'चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :अदा शर्मासेलिब्रिटीमराठी गाणी