Join us  

The Kapil Sharma Show: कपिल शर्मापासून अर्चना पूरन सिंगपर्यंत, एका एपिसोडसाठीचं त्यांचं मानधन वाचून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 7:57 PM

The Kapil Sharma Show : चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर आठवड्याला लोकांना खळखळून हसवतो. या शोमधील सर्व कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा रसिकांचा आवडता कॉमेडी शो राहिला आहे. प्रत्येक वीकेंडला लोक या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. कपिलच्या शोशी संबंधित प्रत्येक पात्र चाहत्यांना खूप हसवते, मग तो कृष्णा अभिषेक असो, किकू शारदा असो किंवा कपिल शर्मा स्वतः. हे सर्व स्टार्स त्यांच्या अचूक कॉमिक टायमिंगने लोकांचे खूप मनोरंजन करतात. अशा परिस्थितीत 'द कपिल शर्मा शो'चे सर्व स्टार्स शोच्या निर्मात्यांकडून फी म्हणून मोठी रक्कम घेतात. या शोसाठी कोणत्या अभिनेत्याला किती फी मिळते हे जाणून घेऊयात.

'द कपिल शर्मा शो'साठी कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma)ला सर्वाधिक मानधन मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल 'द कपिल शर्मा शो'च्या प्रत्येक एपिसोडसाठी ५० लाख रुपये फी घेतो. कपिल व्यतिरिक्त, शोमध्ये सपनाची भूमिका करून लोकांचे मनोरंजन करणारा अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) प्रत्येक एपिसोडसाठी निर्मात्यांकडून १० ते १२ लाख रुपये घेतो.

अभिनेत्री अर्चना पूरन सिंग(Archana Puran Singh)चे मानधनदेखील कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना प्रत्येक एपिसोडसाठी १० लाख रुपये फी घेते. त्याचवेळी चंदू चाय वालाची भूमिका करणारा चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) प्रत्येक एपिसोडसाठी ७ लाख रुपये घेतो. शोमध्ये 'बच्चा यादव'ची प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारा कॉमेडियन किकू शारदा (Kiku Sharda) प्रत्येक एपिसोडसाठी ५ लाख रुपये घेतो, तर सुमोना चक्रवर्ती(Sumona Chakraborty)ची फी ५ ते ६ लाख रुपये आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा अर्चना पूरण सिंगद कपिल शर्मा शो