Join us
Daily Top 2Weekly Top 5

'The Kashmir Files'च्या दिग्दर्शकानं मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 11:23 IST

विवेक अग्निहोत्रींनी २००५ मध्ये 'चॉकलेट' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, पण 'द काश्मीर फाईल्स' मधून त्यांना ओळख मिळाली.

मुंबई - 'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पत्नी पल्लवी जोशी यांनी मुंबईत एक शानदार घर खरेदी केले आहे. अंधेरी परिसरात एक अपार्टमेंटमध्ये घर खरेदी करण्यात आलां आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. Ectasy Reality मध्ये अग्निहोत्री दाम्पत्याने घर खरेदी केले आहे. 

इकोनॉमिक्स टाईम्स रिपोर्टनुसार, विवेक अग्निहोत्री यांनी १७.९२ कोटीमध्ये घर खरेदी केलं आहे. कार पार्किंगसह या घराचा कार्पेट एरिया ३२५८ स्क्वेअर फूट आहे. या घरासाठी जवळपास १.०७ कोटी रुपये स्टँम्प ड्युटी भरण्यात आली आहे. या घराची किंमत ५५ हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट असल्याचं बोललं जात आहे. 

एकेकाळी छप्परच्या घरात राहायचेविवेक अग्निहोत्री यांची ओळख आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. परंतु कधीकाळी ते कौलारू घरात राहायचे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या धन्यौरा गावांत राहणारे होते. त्याच गावात विवेक अग्निहोत्री लहानाचे मोठे झाले. शिक्षण झाले. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांच्या वडिलांनी ते घर विकून मुंबईत वास्तव्यास आले. 

जाहिरात क्षेत्रापासून चित्रपट क्षेत्रात प्रवेशविवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीतून मास कम्युनिकेशन आणि एडवर्टाइजिंग कोर्स केला आहे. मुंबईत येऊन ते चित्रपट निर्माते बनले. अग्निहोत्री यांनी त्यांच्या कामाचा सुरुवात जाहिरात क्षेत्रापासून केली. त्यानंतर टीव्ही सिरियल्स दिग्दर्शित केल्या. याचवेळी त्यांची मुलाखत अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासोबत झाली. काही काळाने पल्लवीसोबत त्यांनी लग्न केले. 

'द काश्मीर फाइल्स' सिनेमामुळे मिळाली ओळख विवेक अग्निहोत्रींनी २००५ मध्ये 'चॉकलेट' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, पण 'द काश्मीर फाईल्स' मधून त्यांना ओळख मिळाली. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भरपूर कमाई केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विवेक अग्निहोत्री हे काही वर्षांपूर्वीपर्यंत पल्लवी जोशीचे पती म्हणून ओळखले जात होते, परंतु आता सर्वजण त्यांना त्यांच्या नावाने आणि 'द काश्मीर फाइल्स'ने ओळखतात. विवेक अग्निहोत्री आज मुंबईत लक्झरी लाइफ जगत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सध्या १० कोटींच्या आसपास आहे. 'द काश्मीर फाइल्स'ने २५० कोटींहून अधिक कमाई केली होती, तर ती अवघ्या २५ कोटींमध्ये तयार झाली होती. आता विवेक अग्निहोत्री 'द दिल्ली फाइल्स' नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. 

टॅग्स :द काश्मीर फाइल्स