Join us

म्हणून प्रियदर्शन जाधवने सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 13:38 IST

अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात झाला.

ठळक मुद्देप्रियदर्शनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात झाला. मात्र या प्रयोगनंतर प्रियदर्शन काहीसा नाराज झालेला दिसतोय. तशी पोस्ट त्यांने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये  प्रियदर्शन लिहिले आहे कि,  ''अगदी अलीकडेच नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात नाट्य प्रयोग करण्याचा योग आला. नाटक होते अर्थातच शांतेचे कार्ट चालू आहे. नाटक चालू असताना अनेकदा, अंदाजे २० वेळा तरी वीज गेली. नाटक रंगात आलं असताना अचानक वीज जाऊन थांबायचं. तरी सगळ्यांनी समरसून प्रयोग केला.'' पुढे प्रियदर्शन लिहितो, मात्र वाईट वाटत राहिलं. लोक इतके पैसे खर्च करून नाटक पाहायला आले आहेत आणि त्यांचा २० वेळा तरी रसभंग झाला. त्यांच्या पैशांची, वेळेची किंमत मोठी आहे. त्यांनी का असं अर्धवट आनंदात नाटक पहायचं ?, इतक्या प्रचंड स्पर्धेत जिथे टीव्ही आहे सिनेमा आहे इंटरनेट आहे तरीही लोक आवर्जून नाटक पाहायला येतात. त्यांना असं गृहीत धरले तर का येतील ते स्वतःहून स्वतःचा रसभंग करायला ??????????, कृपया जबाबदार माणसांनी ह्याची नोंद घ्यावी. मोठा प्रेक्षक आहे नाशिक चा. त्यांना सुध्दा उत्तम सोयी सुविधांचा लाभ मिळावा ही जरी आपली इच्छा असली तरी लवकरात लवकर हा वीज भंग थांबवा.'' आपली नाराजी प्रियदर्शन आपल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे. 

काही महिन्यांपूर्वी प्रशांत दामले यांनी कालिदास कलामंदिराची दुरवस्थाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. प्रशांत दामले यांनी लिहिले होतो नाटकं सादर करणाऱ्या आणि कलावंतांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली होती. 

टॅग्स :प्रियदर्शन जाधव