Join us  

'चंद्रयान ३'च्या यशामुळे आनंदले मनोरंजन विश्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 9:18 PM

Chandrayaan 3 : 'चंद्रयान ३'च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनीही सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे.

'चंद्रयान ३'च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनीही सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. यात शाहरुख खान, अक्षय कुमार, चिरंजीवी, सिद्धार्थ मल्होत्रा, आर. माधवन, विकी कौशल, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, अनुपम खेर, ऋतिक रोशन, काजोल, नवाजुद्दीन सिद्दीकी, एस. एस. राजामौली, विवेक ओबरॉय, शेखर कपूर यांच्यासह बऱ्याच सेलिब्रिटीजचा समावेश आहे.

शाहरुख खान - 'चांद तारे तोड लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं...' आज भारत आणि इस्रोचा बोलबाला झाला. भारताला अभिमानास्पद क्षण देणाऱ्या सर्व वैज्ञानिक, इंजिनियर्स आणि संपूर्ण टिमचे अभिनंदन. चंद्रयान ३ यशस्वी झाले. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग.

अक्षय कुमार - कोट्यवधी लोक इस्रोला धन्यवाद देत आहेत. आम्हाला अभिमान वाटवा असे काम तुम्ही केले आहे. भारताने इतिहास रचत असताना पाहायला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो. भारत चंद्रावर आहे. आम्ही चंद्रावर आहोत. चंद्रयान ३...

ऋतिक रोशन - आज अभिमानाने माझी छाती दुणावली आहे. कारण मी माझ्या लोकांना उंच भरारी घेताना आणि त्यांचे सर्वोत्तम देताना पाहत आहे. इस्रो आणि 'चंद्रयान ३' चंद्र शोध मोहिमेमागील प्रतिभावंतांचे अभिनंदन. चंद्रावर भारत...

सनी देओल - अत्यंत अभिमानास्पद क्षण... हिंदुस्तान झिंदाबाद था और रहेगा. इस्रोचे अभिनंदन... चंद्रावर 'चंद्रयान ३'चे यशस्वी आणि सॉफ्ट लँडिंग. भारतीय अंतरिक्षातील शोधमोहिमेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण यश.

कार्तिक आर्यन - भारत चंद्रावर पोहोचला आहे. अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे हा...

अनुपम खेर - भारत चंद्रावर... देशवासियांनो जय हिंद... 

संजय दत्त - भारतासाठी आणखी एक गरुडझेप. 'चंद्रयान ३' यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. अंतरिक्ष शोधमोहिमेतील हे आपले सर्वात मोठे यश आहे.

अजय देवगण - इतिहासातील हे क्षण जगताना अभिमानास्पद, चकित, उत्साहित आणि सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. भारत माता की जय...

प्रकाश राज - भारत आणि मानवजातीसाठी गौरवाचा क्षण... धन्यवाद इस्रो, चंद्रयान ३, विक्रमलेडर... यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना धन्यवाद. हे आपल्याला आपल्या ब्रह्मांडातील रहस्यांचा उलगडा करण्यासाठी मदत करेल.

आर. माधवन - या यशाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. जय हिंद. माझी छाती अभिमानाने दुणावली आहे.

अनिल कपूर - भारतीय अवकाश तंत्रज्ञान आणि कल्पकतेचे अतिशय नेत्रदीपक प्रदर्शन! भारताच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याबद्दल आपल्या प्रतिभावंतांचे अभिनंदन! इस्रो, चांद्रयान ३, चांद्रयान ३ लँडिंग.

चिरंजीवी - 'चंद्रयान ३' हे भारतासाठी मोठे यश आहे. या अभूतपूर्व आणि अतुलनीय यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. आज आपण इतिहास रचला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा - 'चंद्रयान ३'च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण. जय हिंद.

विकी कौशल - इस्रोच्या टिमचे अभिनंदन. आम्हाला अभिमानास्पद क्षण दिल्याबद्दल धन्यवाद.

मीरा राजपूत - मिशन पूर्ण झाले. 'चंद्रयान ३'साठी इस्रोचे अभिनंदन... भारतीय असल्याचा अभिमान आहे. जग, आम्ही चंद्रावर आहोत... जय हिंद.

टॅग्स :चंद्रयान-3शाहरुख खानसनी देओलअजय देवगणअक्षय कुमारशाहिद कपूरमीरा राजपूत