Join us  

प्रेक्षकांची ही आवडती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 11:30 AM

झी मराठीवरील सगळ्याच मालिकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

ठळक मुद्देतुला पाहते रे ही मालिका महिन्याच्याअखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. 

या मालिकेतील इशा, विक्रम या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. या मालिकतील सुबोधचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत गायत्री दातारची ही पहिला मालिका असली तरी तिने तिच्या अभिनयातातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेच्या फॅन्ससाठी आता एक वाईट बातमी आहे. ही मालिका महिन्याच्याअखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे. 

टीआरपीच्या यादीत तुला पाहाते रे ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.

ईशाला राजनंदिनीचं आयुष्य स्वप्नात दिसतं. त्यानंतर ईशाचा गोंधळ उडतो पण शेवटी ईशाला आपणच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याची खात्री तिला पटते, तसंच तिच्या आयुष्याचं ध्येय देखील तिला कळतं. राजनंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या मागच्या जन्माची देणी फेडण्यासाठी ईशाचा जन्म झाला आहे हे तिला उमगतं. आता ईशाने जयदीपच्या हाती व्यवसायाची सर्व सूत्रं दिली आहेत तसंच ऑफिसमध्ये परांजपे यांच्या मदतीने ती विक्रांतला धडा शिकवण्यासाठी योजना आखात आहे. 

इशा हीच राजनंदिनी असल्याचे आता इशाला कळले असून तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. इशा हीच राजनंदिनी आहे हे विक्रांतला केव्हा कळणार याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या मालिकेच्या शेवटी विक्रांतला त्याने केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल का? इशा विक्रांतने केलेल्या कृत्याचा बदला घेईल का या प्रश्नांची उत्तरे काहीच दिवसांत मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. 

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार