Join us  

​तुम्ही अशाप्रकारे सहभागी होऊ शकता इंडियन आयडल या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 7:07 AM

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला ...

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला मिळून दिले आहेत. आज हे गायक बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण करत आहेत. या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. देशातील सर्वात मोठा गायनाचा रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलकडे पाहिले जाते. या कार्यक्रमाचा दहावा सिझन देखील सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाने भारताला प्रतिभावंत गायक दिले असून यंदाचा सिझन देखील आजवरच्या इतर सिझनसारखा दमदार असणार आहे. उगवत्या गायकांना आगामी इंडियन आयडल कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्ये दाखल होण्यासाठी सोनी Liv अॅपच्या मदतीने ‘जम्प द क्यू’ मार्फत एक शेवटची संधी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया अतिश सोपी आहे... सोनी Liv अॅप डाऊनलोड करा. ‘जम्प द क्यू’ बॅनरवर क्लिक करा, तुमच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि अपलोड करा. त्यातून निवडलेल्या स्पर्धकांना एका खास ऑडिशनसाठी मुंबईत बोलावण्यात येईल. ही आगळीवेगळी संधी फक्त ३० मे पर्यंत सोनी Liv अॅप मार्फत नवोदितांसाठी खुली आहे.इंडियन आयडॉल हा गायकांसाठीचा सर्वात प्रतिष्ठित असा मंच आहे आणि गेल्या काही वर्षांत यातून भारतातील काही उत्कृष्ट गायक, गायिका पुढे आल्या आहेत. या सिझनच्या खबर फैला दो मोहिमेनंतर जयपूर, लखनऊ, गुवाहाटी, भुवनेशवर, देहरादून, चंदिगड, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, इंदूर आणि इटानगर येथील ऑडिशन्सना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आपले नशीब अजमावून संगीत जगतात आपला ठसा उमटवण्याच्या इच्छेने उगवत्या गायकांनी त्यात भाग घेतला.संगीत क्षेत्रातील दिग्गज अनू मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी या सिझनमध्ये परीक्षकाची जबाबदारी सांभाळतील तर मनिष पॉल या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच अनू, नेहा आणि विशाल यांनी सोशल मीडियावरून गायकांना ‘जम्प द क्यू’ मध्ये सहभागी होऊन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले.Also Read : ​​इंडियन आयडलची ही पूर्व स्पर्धक बनणार आता इंडियन आयडलची परीक्षक