Join us  

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत रॉकी भूमिका साकारणारा अभिनेता आहे 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 8:00 AM

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतल्या कथानकानुसार मालिकेतल्या कलाकारांचा अभिनयही रसिकांची पसंतीस पात्र ठरत आहे. स्वीटू, ओम,मालविका, नलू मावशी जसे प्रसिद्ध झाले आहेत तसेच रॉकी या भूमिकेनेही रसिकांची पसंती मिळवली आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत आता स्वीटू आणि ओम ह्यांचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. मालिकेत आलेल्या ट्वीस्टमुळे मालिका पुन्हा एकदा रसिकांची आवडती मालिका बनली आहे.अखेर नलू मावशीने ओम आणि स्वीटूच्या नात्याला होकार दिल्याने त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रसिकांसाठी मालिकेचे आगामी भाग पाहणे रंजक असणार आहे. सोबतच पुढे मालिकेत काय घडणार, स्वीटू आणि ओम लग्नबंधनात कधी अडकणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

मालिकेतल्या कथानकानुसार मालिकेतल्या कलाकारांचा अभिनयही रसिकांची पसंतीस पात्र ठरत आहे. स्वीटू, ओम,मालविका, नलू मावशी जसे प्रसिद्ध झाले आहेत तसेच रॉकी या भूमिकेनेही रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेत रॉकी साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव त्रियुग मंत्री असे आहे.

त्रियुगला याच मालिकेमुळे प्रचडं लोकप्रियता मिळाली आहे. यापूर्वीही तो वेगवेगळ्या मालिकेतून झळकला आहे. 'सीआयडी', 'संकटमोचन महाबली हनुमान', 'सम्राट अशोक', 'महाराणा प्रताप', 'विघ्नहर्ता गणेश' या हिंदी मालिकांप्रमाणेच 'पेबॅक, नगरसेवक – एक नायक' सिनेमातूनही तो झळकला आहे. 

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्याच्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. त्रियुगला लहानपणापासून अभिनयाचे धडे मिळाले आहे. त्रियुगची आईसुद्धा मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री काम केले आहे. त्रियुगचे वडील नितीन मंत्रीसुद्धा नाट्यकलाकार होते.

त्रियुगची आई सुलभा मंत्री यांनी 'चोरबाजार', 'टपाल', 'धुमशान', 'पूर्ण सत्य', 'प्रेमासाठी वाट्टेल ते', 'आधारस्तंभ', 'भोळाशंकर', 'उतरण', 'दामिनी', 'आमची माती आमची माणसं', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' यासारख्या अनेक हिंदी मराठी सिनेमा तसेच मालिका आणि नाटकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे यांच्यासोबतही त्या सिनेमात झळकल्या आहेत. २०१३ साली वयाच्या ६३ व्या वर्षी सुलभा मंत्री यांचे निधन झाले. त्रियुगचे आई वडिल दोन्ही आज नसले तरी सिनेसृष्टीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.