Join us  

‘बिग बॉस12’च्या घरात दिसणार ब्रिटीश अ‍ॅडल्ट स्टार डेनी डी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:14 PM

बिग बॉस’ हा हिंदी रिअ‍ॅलिटी शो लवकरचं प्रसारित होतोय. ‘बिग बॉस’चे हे १२ वे सीझन असेल. या १२ व्या सीझनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण सेलिब्रिटी येणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत.

‘बिग बॉस’ हा हिंदी रिअ‍ॅलिटी शो लवकरचं प्रसारित होतोय. ‘बिग बॉस’चे हे १२ वे सीझन असेल. या १२ व्या सीझनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण सेलिब्रिटी येणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. याचदरम्यान एक ताजी खबर आहे. होय, जगातील सगळ्यांत धनाढ्य अ‍ॅडल्ट स्टार डेनी डी या सीझनमध्ये दिसणार असल्याचे कळतेय. या घरात त्याच्यासोबत अभिनेत्री व मॉडेल माहिका शर्मा एन्ट्री घेणार, असेही कळतेय. माहिका शर्मा डेनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, असे मानले जाते. स्वत: माहिकाने अनेकदा याबाबतची हिंट दिली आहे.

ब्रिटीश अ‍ॅडल्ट स्टार डेनी लवकरच टीव्ही अभिनेत्री माहिका शर्मासोबत ‘द मॉडर्न कल्चर’ मधून बॉलिवूड डेब्यू करतोय. मध्यंतरी माहिकाने डेनीबद्दलचे आपले प्रेम जगजाहिर केले होते. डेनी माझे लक आहे. माझा सुपरहिरो आहे़. होय, मी अ‍ॅडल्ट फिल्म्स पाहते आणि यात काहीही चुकीचे नाही़, असे ती म्हणाली होती. या माहिकासोबत डेनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार असल्याचे समजतेय. बॉलिवूडलाईफशी बोलताना डेनीनेही याबद्दलचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत. ‘बिग बॉस’मधील एन्ट्रीबद्दल सध्या मला ठाऊक नाही. माझ्या मॅनेजरकडे याबद्दलची संपूर्ण माहिती असेल. पण कुठल्या एका शोची आॅफर माझ्याकडे आली आहे, एवढे मला ठाऊक आहे. पण हा शो ‘बिग बॉस’ आहे की ‘बिग ब्रदर’ हे मला ठाऊक नाही, असे डेनीने सांगितले. मी ‘बिग बॉस’साठी होकार देऊ शकतो. केवळ माहिकाने घराच्या आत माझी काळजी घ्यावी, माझे मनोरंजन करावे. तिने मला याबद्दल आश्वस्त केले तर मी ही आॅफर स्वीकारण्याबद्दल विचार करू शकतो, असेही तो पुढे म्हणाला.बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, माहिकाने अलीकडे ‘बिग बॉस’संदर्भात चॅनलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तिला याबद्दल विचारले असता तिने यावर बोलण्यास नकार दिला. सध्या मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही. पण हा शो तुम्हाला एक संधी देते. माझ्यासाठी ‘बिग बॉस’चे घर एका विद्यापीठासारखे आहे. सलमानकडून या विद्यापीठाची डिग्री घेणे इतके सोपे नाही़.यासाठी माणूस मनातून खंबीर हवा, असे माहिका म्हणाली.

बिग बॉस’च्या १२ व्या सीझनमध्ये स्पर्धक जोड्यांमध्ये दिसणार आहेत. ‘बिग बॉस’चे आगामी सीझन कमालीचे बोल्ड असणार आहे. ‘बिग बॉस११’चा टीआरपी फार चांगला नव्हता. ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनमध्ये ही कसर भरून काढण्याचे मेकर्सचे प्रयत्न असल्याचे कळतेय. यासाठी शोला बोल्डनेसचा तडका लावला जाणार असल्याची माहिती आहे

 

टॅग्स :सलमान खान