Join us

मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:56 IST

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात 'माय' ...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात 'माय' मानतो मराठी !!! आज मराठी भाषा दिन. या दिनानिमित्त सकाळापासून सर्व मराठी कलाकारांनी सोशलमिडीयावर आपल्या मायबाप रसिकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये  रितेश देशमुख,सुबोध भावे, स्पृहा जोशी, अवधुत गुप्ते, अमृता खानविलकर, प्रसाद ओक आदि कलाकारांचा समावेश आहे.तसेच मराठी भाषादिनानिमित्त आज एक तरी मराठी कविता शेअर केली पाहिजे असे आवाहन देखील केले.