फरहा खानची ही इच्छा पूर्ण होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 16:38 IST
युवराज सिंग आणि हॅजल कीच लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची वाट गेल्या कित्येक दिवसांपासून युवराजचे चाहते पाहात अाहेत. ...
फरहा खानची ही इच्छा पूर्ण होणार का?
युवराज सिंग आणि हॅजल कीच लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची वाट गेल्या कित्येक दिवसांपासून युवराजचे चाहते पाहात अाहेत. युवराज हा प्रसिद्ध क्रिकेटर आहे तर हॅजलने बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाला क्रिकेट क्षेत्रातील आणि बॉलिवूडच्या क्षेत्रातील अनेक मंडळी हजेरी लावणार आहेत. युवराजचे लग्न तर धुमधडाक्यात होणार आहे. पण त्याचसोबत त्याचे संगीतदेखील खूप गाजतवाजत होणार आहे. युवराज हा स्वतः खूप चांगला डान्सर आहे. त्यामुळे त्याच्या संगीतात तो एखाद्या तरी गाण्यावर नृत्य सादर करेन अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. नुकताच युवराज झलक दिखला या कार्यक्रमात सेलिब्रिटी जज म्हणून गेला होता. या कार्यक्रमात फरहा खान परीक्षकाची भूमिका साकारते. ती युवराजची चांगली मैत्रीणदेखील आहे. युवराजने त्याचे नृत्यकौशल्य झलक दिखला जा या कार्यक्रमातदेखील दाखवले. कल हो ना हो या चित्रपटातील माही वे या गाण्यावर त्याने खूप चांगले नृत्य सादर केले. त्याचे हे नृत्य पाहून स्पर्धकांनी, परीक्षकांनी तसेच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच त्याला खूप चांगली दाद दिली. त्याचे हे नृत्य पाहून फरहा खानने युवराजच्या संगीताची कोरिओग्राफी मला करायला आवडेल अशी इच्छा कार्यक्रमातच सगळ्यांसमोर व्यक्त केली. फरहा म्हणाली, "मी शपथ घेते की, युवराजच्या संगीताची कोरिअोग्राफी मी करणार." आता फरहाची ही इच्छा पूर्ण होते की नाही हे काहीच दिवसांत कळेल. कारण युवराजचे लग्न काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे.