Join us

सिमर घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:40 IST

ससुराल सिमर का या मालिकेत सुरुवातीला प्रेक्षकांना दोन बहिणीची कथा पाहायला मिळाली होती. त्यानंतर या मालिकेची कथा संपूर्णपणे बदलण्यात आली. कथेत ...

ससुराल सिमर का या मालिकेत सुरुवातीला प्रेक्षकांना दोन बहिणीची कथा पाहायला मिळाली होती. त्यानंतर या मालिकेची कथा संपूर्णपणे बदलण्यात आली. कथेत सुपरनॅचरल पॉवरसंबंधित गोष्टींचा समावेश करण्यात आला. यानंतर मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढला. पण मालिकेने नुकताच 20 वर्षांचा लीप घेतला आणि त्यामुळे मालिकेचा टीआरपी ढासळत गेला. मालिकेच्या ढासळलेल्या टीआरपीमुळे वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले जात आहे. पुढील दोन महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.