Join us  

बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 8:00 AM

बाजीगर या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट शिल्पा शेट्टीचा पहिलाच चित्रपट होता.

ठळक मुद्देआम्ही बाजीगरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला 'काली काली आँखे' या गाण्याचा एक भाग व्हायचे होते. परंतु माझ्याऐवजी काजोलवर हे गाणे चित्रीत करण्याचे ठरले. त्यावेळी मला खूप राग आला होता.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात कुमार सानू हजेरी लावणार आहे. 

कुमार सानूच्या प्रसिद्ध गाण्यांवर सुपर डान्सरमधील स्पर्धक परफॉर्मन्स सादर करणार असून मातृदिनाच्या निमित्ताने स्पर्धक हे परफॉर्मन्स आपल्या आईला समर्पित करणार आहेत. तसेच कुमार सानू साजन या चित्रपटातील त्यांची प्रसिद्ध गाणी तसेच चुरा के दिल मेरा, आँख मारे आणि इतर अनेक त्याची प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसोबतच कार्यक्रमाचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर त्यांच्या गाण्यांना भरभरून दाद देणार आहेत.

'चुरा के दिल मेरा' या गाण्यावर पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स साक्षीम आणि वैभव सादर करणार आहेत. या गाण्यावरील परफॉर्मन्स पाहाताना शिल्पा शेट्टीला या चित्रपटाच्या संबंधीत असलेल्या काही आठवणी आठवणार असून ती त्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तिने सांगितलेल्या या गोष्टी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटणार आहे. 

बाजीगर या चित्रपटातील काली काली आँखे हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटातील हे गाणे या चित्रपटाच्या सगळ्याच टीमला प्रचंड आवडले होते. शिल्पाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने काली काली आँखे या गाण्यावर आपल्याला नृत्य करायला मिळावे असे तिला वाटत होते. तिनेच याविषयी सुपर डान्सर मध्ये सांगितले. शिल्पा सांगते, "आम्ही बाजीगरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला 'काली काली आँखे' या गाण्याचा एक भाग व्हायचे होते. परंतु माझ्याऐवजी काजोलवर हे गाणे चित्रीत करण्याचे ठरले. त्यावेळी मला खूप राग आला होता. कारण काजोलचे डोळे काळे नसताना देखील काली काली आँखे तिच्यावर कसे चित्रीत होऊ शकते असा मला प्रश्न पडला होता.  

बाजीगर या चित्रपटातील काली काली आँखे हे गाणे इतके गाजले की, आजही या गाण्यावर लोकांना नृत्य करायला आवडते. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीकाजोलसुपर डान्सरकुमार सानूशाहरुख खान