Join us

विवेक दहिया त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठीला का किस करू शकत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 15:41 IST

विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी यांचे लग्न या वर्षीच्या 8 जुलैला झाले. पण दिव्यांका ये है मोहोब्बते तर विवेक ...

विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी यांचे लग्न या वर्षीच्या 8 जुलैला झाले. पण दिव्यांका ये है मोहोब्बते तर विवेक दहिया कवच... काली शक्तियों से आणि ये है मोहोब्बते या दोन्ही मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र होता. त्यामुळे त्यांना लग्नानंतर एकमेकांसाठी वेळ काढता आला नाही. ते दोघे लग्नानंतर कुठेच हनिमुनला गेले नव्हते. पण आता लग्नाच्या पाच महिन्यांनंतर ते दोघे दोन आठवड्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. त्यांनी ख्रिसमस पॅरिसमध्ये तर नववर्ष लंडनमध्ये साजरे करायचे ठरवले आहे. ये है मोहोब्बते या मालिकेत विवेक आणि दिव्यांका दोघे एकत्र काम करतात. त्यांनी हनिमूनला रवाना होण्याआधी ये है मोहोब्बतेच्या सेटवर एक सेल्फी काढून इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर विवेकने पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत आज पॅकअप होताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या ट्रीपला रवाना होण्यासाठी आता केवळ काही तास उरले आहेत असे विवेकने म्हटले आहे. त्याचसोबत विवेकने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत विवेक आणि दिव्यांका दोघांनीही खोटे नाक लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या फोटोखाली थ्री इडियट या चित्रपटातील क्या किस करते हुए नाक टकराती है असे कॅप्शन लिहिले आहे. दिव्यांका आणि विवेकचे हे फोटो पाहून ते त्यांच्या या ट्रीपसाठी किती एक्सायटेड आहे ते आपल्याला कळत आहे.