Join us

​का हा अबोला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:08 IST

मे आय कम इन मॅडम या मालिकेत नेहा पेंडसे आणि संदीप आनंद प्रमुख भूमिकेत आहेत. अनेकवेळा मालिकांत प्रमुख भूमिका ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत नेहा पेंडसे आणि संदीप आनंद प्रमुख भूमिकेत आहेत. अनेकवेळा मालिकांत प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार एकमेकांशी बोलत नसल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. नेहा आणि संदीपच्या बाबतीतही काहीसे असेच आहे. हे दोघेही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असल्याने या दोघांचे अधिकाधिक चित्रीकरण हे एकत्र असते. पण खऱ्या आयुष्यात हे दोघेही एकमेकांशी अजिबातच बोलत नसल्याचे कळतेय. या दोघांमध्ये अबोला असला तरी ते याचा परिणाम त्यांच्या मालिकेवर होऊ नये याचा ते नेहमीच प्रयत्न करतात. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूपच आवडते. आपल्या वैयक्तिक गोष्टी बाजू ठेवून हे दोघे आपले काम खूपच चांगल्या पद्धतीने करत आहेत. यावरून हे दोघेही खूपच चांगले कलाकार आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.