Join us  

रेशम किंवा राजेश मधून कोण जाणार बिग बॉसच्या घरातून बाहेर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 5:37 AM

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जाते. परंतु, काल प्रेक्षक तसेच घरातील ...

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जाते. परंतु, काल प्रेक्षक तसेच घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा महेश मांजरेकर यांनी घरातून कोण बाहेर जाणार याचा निकाल सोमवारी लागणार अशी घोषणा केली. सध्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी रेशम आणि राजेश डेंजर झोन मध्ये आहेत. तेंव्हा हे बघणे रंजक असणार आहे कि, या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. बिग बॉस मराठी मध्ये आज स्मिता गोंदकरसाठी आस्ताद काळाने का मुंडन केले ? आज कुठल्या प्रकारचा टास्क बिग बॉस घरातील सदस्यांना देणार आहेत ? हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी. कालच्या WEEKEND चा डाव मध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर आले होते. बिग बॉसने घरातील सदस्यांना काल एक टास्क दिला, ज्यामध्ये बिग बॉसच्या घरातील रहिवाश्यांना मातीचे मडके फोडायचे होते ज्यावर त्यांना घरातील एका सदस्याचा फोटो लावायचा होता. मेघाने रेशमचा फोटो लावून मडकं फोडले तर रेशमने मेघाचा तसेच राजेशने सईचा फोटो लावून मडकं फोडले. घरातील सदस्यांचा निरोप घेताना सचिन पिळगावकर यांनी घरातील सदस्यांना एक संदेश दिला. महेश मांजरेकर यांनी जेंव्हा या दोघांना विचारले त्यांचा घरातील आवडता सदस्य कोण तेंव्हा स्वप्नील जोशीने मेघा आणि सईचे नाव घेतले कारण, त्या जिंकण्यासाठी खेळत आहेत असे वाटते तर सचिनजींनी उषा नाडकर्णी यांचे नाव घेतले.आज रेशम आणि राजेशमधून कोण घराबाहेर जाणार ? कोणाला मिळणार विशेष अधिकार ? आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवणार ? आणि पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.