Join us  

Bigg Boss Marathi Grand Finale : कोण होणार ‘बिग बॉस मराठी’चा विजेता? मेघा की पुष्कर??

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 9:01 PM

वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी’ कळायला अगदी काही मिनिटांचा अवकाश उरलाय.

वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी’ कळायला अगदी काही मिनिटांचा अवकाश उरलाय. सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता असे सहा स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेमध्ये होते. यापैकी पहिल्या बाद फेरित शर्मिष्ठा राऊत बाद झाली. यानंतर आस्ताद काळे घराबाहेर झाला. फिनालेतील तिसऱ्या फेरीत सई लोकूरही बाद झाली. त्यामुळे  केवळ मेघा धाडे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर हे तिघेचं विजेत्याच्या शर्यतीत उरलेत. या तिघांतही काट्याची टक्कर आहे. पण यापैकी मेघा आणि पुष्कर या दोघांचेही पारडे विशेष जड मानले जात आहे.

 पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात आहे.  किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. ‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. ज्या सई व पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केलेत. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात जान आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवलेत. पुष्कर हाही या शोच्या विजेत्यांमधील एक महत्त्वाचा दावेदार आहे. आता काही तासांतच बिग बॉसच्या विजेत्याचे नाव समोर येणार आहे.

 

 

 

 

टॅग्स :बिग बॉस मराठी