Join us

फॅन चिडते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:54 IST

सिया के राम ही मालिका पूर्वी आठवड्यातील सातही दिवस दाखवली जात असे. पण आता ही मालिका केवळ पाचच दिवस ...

सिया के राम ही मालिका पूर्वी आठवड्यातील सातही दिवस दाखवली जात असे. पण आता ही मालिका केवळ पाचच दिवस दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालिका प्रसारित होण्याचे दिवस कमी झाले असल्याने अनेक फॅन्सना प्रचंड वाईट वाटत आहे. दिल्लीत राहाणाऱ्या अन्वी बन्सल या सहा वर्षांच्या चिमुरडीने तर चिडून वाहिनीला पत्र लिहिले होते. या पत्रानंतर वाहिनीतील मंडळींनी या चिमुरडीची हैद्राबादला सेटवर जाण्याची व्यवस्था केली. अन्वीने तिथे जाऊन या मालिकेतील आशीष शर्मा, करण सूचक, दानिश अख्तर आणि मदिराक्षीची भेट घेतली. आपल्या लाडक्या सीतेची म्हणजेच मदिराक्षीची भेट घेऊन तर ती खूपच खूश झाली. अन्वीने स्वतः बनवलेले ग्रीटिंग कार्ड या टीमला भेटवस्तू म्हणून दिले.