Join us

​इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेसाठी शिवानी तोमरने टोचले नाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 10:28 IST

आपली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडावी त्यासाठी सगळेच कलाकार खूप प्रयत्न करत असतात. सध्या तर आपल्या व्यक्तिरेखेसाठी वजन कमी करण्याचे आणि ...

आपली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडावी त्यासाठी सगळेच कलाकार खूप प्रयत्न करत असतात. सध्या तर आपल्या व्यक्तिरेखेसाठी वजन कमी करण्याचे आणि वजन वाढवण्याचे फॅड बॉलिवूडमध्ये चांगलेच रूजू झाले आहे. एवढेच नव्हे तर व्यक्तिरेखेसाठी केस कापणे अथवा पूर्ण टक्कल करणे अशा देखील गोष्टी कलाकार सर्रास करताना दिसतात. आपल्या व्यक्तिरेखेसाठी बॉलिवूड कलाकार जितकी मेहनत घेतात तितकीच मेहनत आज मालिकेतील कलाकारही घेत असल्याचे आपल्याला दिसत आहे.इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या यशानंतर प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा भाग पाहायला मिळाला होता. पण हा भाग तितका गाजला नव्हता. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या भागात प्रेक्षकांना बरुण सोबती पुन्हा पाहायला मिळाला आहे. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये बरुण सोबती आणि सान्या इराणीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण आता तिसऱ्या भागात शिवानी तोमर झळकत आहे. शिवानी या मालिकेत चांदनी ही भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी ती सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. शिवानी ही खऱ्या आयुष्यात अतिशय शांत आहे. ती मुळची अलाहाबादची असून ती खूपच धार्मिक आणि श्रद्धाळू आहे. या मालिकेत तिची वेशभूषा अतिशय साधी ठेवण्यात आली आहे. तिने या मालिकेसाठी नाक देखील टोचले आहे. याविषयी शिवानी सांगते, मला नेहमीच नव-नवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात. चांदनी या भूमिकेची वेशभूषा, तिची स्टाइल मला खूपच आवडली आहे. या व्यक्तिरेखेला अनेक पैलू असून ही भूमिका मी सध्या खूप एन्जॉय करत आहे.Must read : अभिनयक्षेत्रात संयम राखणे गरजेचे ः शिवानी तोमर