Join us  

कौन बनेगा करो़डपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या कॉम्प्युटरवर दिसतात या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 5:42 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावतात. प्रेक्षकांना त्यांचे सूत्रसंचालन प्रचंड भावते. या कार्यक्रमाने अमिताभ यांना छोट्या पडद्यावरही तितकेच महत्त्व मिळवून दिले. या कार्यक्रमाने आजवर अनेक स्पर्धकांना करोडपती बनवले आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

कौन बनेगा करो़डपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा दहावा सिझन असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावतात. प्रेक्षकांना त्यांचे सूत्रसंचालन प्रचंड भावते. या कार्यक्रमाने अमिताभ यांना छोट्या पडद्यावरही तितकेच महत्त्व मिळवून दिले. या कार्यक्रमाने आजवर अनेक स्पर्धकांना करोडपती बनवले आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या स्क्रीनवर येत असेल असे आपल्याला सगळ्यांना वाटते... पण हे खरे नाहीये. अमिताभ बच्चन यांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. त्यांच्या स्क्रीनवर देखील प्रश्नाचे उत्तर येत नाही. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाने उत्तर दिल्यानंतर ये जबाब लॉक कर दू... असे अमिताभ बच्चन हमखास विचारतात. उत्तर लॉक केल्यानंतरच अमिताभ यांना उत्तर त्यांच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. त्यामुळे उत्तर लॉक करेपर्यंत त्यांना देखील अचूक उत्तर माहीत नसते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या स्क्रीनवर काय असते असा प्रश्न नेहमीच या कार्यक्रमाच्या फॅन्सना पडलेला असतो. त्यांच्या स्क्रीनवर नक्की काय दिसते याचा खुलासा नुकताच एका स्पर्धकाने केला आहे. कौन बनेगा करोडपतीच्या दहाव्या पर्वात १२.५ लाख जिंकणारे अभिनव पांडे यांनी अमिताभ यांच्या स्क्रीनवर काय दिसते याविषयी एका सोशल नेटवर्किंग साइटवर लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळताना अमिताभ यांच्या अगदी मागे ते बसलेले होते. त्यामुळे त्यांच्या कॉम्प्युटरवर काय सुरू आहे हे त्यांना दिसत होते. अमिताभ यांच्या कॉम्प्युटरवर कंटेट स्किप करण्यासोबतच ते ऑपरेटही करू शकतात. टाइमर आणि प्रश्न सेट करणारा कॉम्प्युटर ऑपरेटर दुसऱ्या ठिकाणी बसलेला असतो. पण अमिताभ यांच्या कॉम्प्युटरवर देखील प्रश्नाचे उत्तर नसते. 

टॅग्स :अमिताभ बच्चन