ये रिश्ता क्या कहलाता है मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:05 IST
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खान हे नाव प्रसिद्धीझोतात आले. या मालिकेत तिने साकारलेली अक्षराची भूमिका ...
ये रिश्ता क्या कहलाता है मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला साखरपुडा
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खान हे नाव प्रसिद्धीझोतात आले. या मालिकेत तिने साकारलेली अक्षराची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेचा ती अनेक वर्षं भाग होती. पण काहीच महिन्यांपूर्वी तिने या मालिकेला रामराम ठोकला. या मालिकेनंतर ती खतरों के खिलाडी आणि बिग बॉस या दोन रिअॅलिटी शोमध्ये झळकली. बिग बॉसमध्ये असताना तिचा प्रियकर रॉकी जयस्वाल आणि तिच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या काही भागांमध्ये देखील आपल्याला रॉकीला पाहायला मिळाले होते. रॉकी हिनाला भेटायला बिग बॉसच्या घरात देखील दाखल झाला होता. बिग बॉसच्या घरात जाऊन तो हिनाला प्रपोज करणार असल्याची चर्चा होती. पण त्यावेळी काही तसे घडले नाही. पण आता हिनाच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आले. गेल्या काही दिवसांपासून रॉकी आणि हिना दुबई मध्ये असून एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. दुबईत असताना त्यांनी साखरपुडा केला असल्याच्या बातम्या येत आहेत. हिना खान आणि रॉकी जयस्वाल अनेक वर्षांपासून नात्यात आहेत आणि त्यांनी त्यांचे हे नाते कधीच माध्यमांपासून लपवलेले नाही. ते अनेक कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यात देखील एकत्र पाहायला मिळतात. त्यांनी आता दुबईत जाऊन साखरपुडा केला असल्याची चर्चा आहे. हिना गेल्या काही दिवसांपासून फॅशन वीकच्या निमित्ताने दुबई येथे आहे. तिला सरप्राईज देण्यासाठी रॉकी देखील तिथे पोहोचला आणि त्याने वाळवंटाच्या मधोमध तिला नेऊन रॉमेंटिक अंदाजात प्रपोज केले असे म्हटले जात आहे. रॉकीला कित्येक दिवसांपासून हिनाला अशाप्रकारे हटके प्रपोज करायचे होते. त्यामुळे त्याने दुबईला जाऊन तिला प्रपोज करण्याचे ठरवले. इंडिया डॉट कॉम या वेबसाईटनुसार हॉट एअर बलूनमधून वाळवंटाची सफर करायला हिना आणि रॉकी गेले असताना रॉकीने गुडघ्यांवर बसून हिनाला प्रपोज केले.हिना आणि रॉकीची ओळख ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवरच झाली होती. या मालिकेचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून तो काम करत होता. Also Read : ट्रोलर्सला वैतागून हिना खानने दिली धमकी; म्हटले, अकाउंट डिलीट करणार!