चक्क या स्टाइलने केले अभिनेत्री मुग्धाने लग्न?याच पद्धतीने लग्न करण्याचे होते स्पप्न?जाणून घ्या या हटके लग्नाविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:13 IST
सतरंगी ससुराल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई नुकतेच लग्नबंधनात अडकले. या दोघांची ओळख सतरंगी ...
चक्क या स्टाइलने केले अभिनेत्री मुग्धाने लग्न?याच पद्धतीने लग्न करण्याचे होते स्पप्न?जाणून घ्या या हटके लग्नाविषयी
सतरंगी ससुराल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई नुकतेच लग्नबंधनात अडकले. या दोघांची ओळख सतरंगी ससुराल याच मालिकेच्या सेटवर झाली होती. ते दोघे या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे गेल्या वर्षापासून नात्यात आहे. वर्षभराच्या नात्यानंतर त्या दोघांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्नाचा निर्णय घेतला. वर्षाच्या सुरुवातीला त्या दोघांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. मुग्धा आणि रविशचे लग्न मुंबईत महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले. लग्नात मुग्धाने पिवळ्या रंगाची नववारी तर रविशने क्रीम रंगाचा कुर्ता घातला होता. मुग्धा नववारी साडीत खूपच छान दिसत होती. तिने लग्नात एखाद्या मराठी वधूप्रमाणे साजशृंगार केला होता. तिने नाकात नथ घातली होती. तसेच केसात गजरा माळला होता. सतरंगी ससुराल या मालिकेतील मुग्धा आणि रविश यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या दोघांचे फॅन त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. सध्या छोट्या पडद्यावर लग्नाचा मौसम आला आहे. किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचे 16 डिसेंबरला लग्न आहे तर नुकतेच अभिनेत्री सौम्या टंडननेदेखील लग्न केले. पण तिने गाजावाजात लग्न न करता गुपचुप लग्न केले. ती गेल्या 10 वर्षांपासून बँकर सौरभ देवंद्र सिंहसह लिव्ह इनमध्ये राहत होती. कॉलेजपासूनच सौम्या सौरभची चांगली मैत्री होती. दहा वर्षांनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा लग्नाचा सोहळा मुंबईत अत्यंत साधेपणाने पार पडला.