Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये लगीनसराई, शुभम आणि कीर्ती अडकणार विवाहबंधनात

By तेजल गावडे | Updated: October 1, 2020 17:46 IST

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम-कीर्तीच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम-कीर्तीच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. जीजी अक्कांनी आपला शब्द खरा करत पंधरा दिवसाच्या आत शुभमसाठी मुलगी शोधली. मुलगी शिकलेली नको या मतावर त्या ठाम आहेत. एकीकडे आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पहाणारी कीर्ती शिक्षणाचं महत्त्व नसलेल्या घरात संसार कसा करणार याची उत्सुकता आता वाढली आहे.

आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे. त्यामुळे लग्नानंतर शुभम कीर्तीचा संसार बहरणार की नवी संकटं उभी राहणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी न चुकता पहा ‘फुलाला सुगंध मातीचा’ दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

‘फुलाला सुगंध मातीचा’ कथामुलीच्या जन्माप्रमाणेच तिचं शिक्षण हा देखिल नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह