प्रतीक्षा लोणकर सध्या थपकी प्यार की या मालिकेत काम करत आहे. या मालिकनंतर आता ती बढो बहू या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत रितायशा राठोड, प्रिन्स नरुला, पंकज धीर आणि अरहान खानही प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत प्रतिक्षा बढोच्या आईची भूमिका साकारणार आहे. आजपर्यंत प्रचंड कष्ट करून घर आपल्या हिमतीवर उभ्या केलेल्या स्त्रीची भूमिका ती साकारणार आहे. प्रतिक्षाची या मालिकेतील भूमिका ही अतिशय सकारात्मक असून ही भूमिका साकारण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचे कळतेय.
प्रतीक्षा मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 12:57 IST