व्हॉइस किड्स शोच्या जजेची एंट्री होणार आकाशातून !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:24 IST
व्हॉइस इंडिया किड्स सीझन २ लवकरच टीव्हीच्या पडद्यावर झळकणार आहे आणि अत्यंत धूमधडाक्यात हा शो चालवणारे सेलिब्रिटी प्रशिक्षक आहेत- ...
व्हॉइस किड्स शोच्या जजेची एंट्री होणार आकाशातून !
व्हॉइस इंडिया किड्स सीझन २ लवकरच टीव्हीच्या पडद्यावर झळकणार आहे आणि अत्यंत धूमधडाक्यात हा शो चालवणारे सेलिब्रिटी प्रशिक्षक आहेत- ख्यातनाम गायक आणि संगीत दिग्दर्शक- हिमेश रेशमिया, कायम हसतमुख असलेले आणि अदभुत गायक शान, अत्यंत सुंदर गायक आणि गीतकार पापॉन आणि सर्वांत तरूण कोच पलक मुछाल. या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांसाठी एक देणगी ठरणार असून यातील चारही प्रशिक्षक अक्षरशः आकाशातून उतरताना दाखवण्यात आले आहेत. या फँटास्टिक फोरने आपला प्रवेश चॉपरमधून चित्रित केला असून त्यांच्यापैकी कोणालाही रिटेकची गरज पडलेली नाही. हा सीझन टॅलेंटच्या बाबतीत फक्त मोठा आणि चांगलाच नाही तर तो देखणा असेल आणि स्वॅग असेल जो प्रेक्षकांना पाहण्यासाठी प्रेरित करेल. इतक्या दिमाखदार प्रारंभानंतर या सीझनमध्ये काय काय पाहायला मिळेल याच्या प्रतीक्षेत आपण असू. या दिमाखदार उद्घाटनाबाबत बोलताना पापॉन म्हणाला, प्रशिक्षकांचा प्रवेश अत्यंत दिमाखदार आहे आणि असा प्रवेश खूप दुर्मिळ असतो. हे इतके वेगळे आहे की हा विचार करण्याची भावनाच खूप छान आणि आकर्षक होती. मी अशा कोणत्याही गोष्टीचा यापूर्वी कधीही अनुभव घेतला नव्हता. ते या वेळी प्रथमच एका रिअलिटी शोचे परीक्षण करणार असल्यामुळे त्यांच्या अपेक्षांनुसार पाहता ते टॅलेंटमुळे खूप प्रभावित झालेले दिसले.अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच इतकी सुंदर प्रतिभा दिसली आहे की पुढे परीक्षण करणे प्रशिक्षकांसाठी खूप कठीण जाईल. ही एक चांगली गोष्ट आहे जी मी या शोबाबत विचार करत आहे कारण अगदी सुरूवातीलाच माझ्या अपेक्षा पूर्ण होतील.भारताला आपला सर्वात प्रभावशाली युवा आवाज मिळवून देण्यासाठी आघाडीचा गायक आणि संगीतकार – हिमेश रेशमिया; हसतमुख आणि अद्वितीय प्रतिभेचा गायक शान, भावविभोर आवाजाचा गायक आणि संगीतकार पापोन आणि सर्वात तरुण प्रशिक्षक बनलेली गायिका पलक मुछल अशा चार जबरदस्त प्रशिक्षकांची साथ या पर्वाला लाभली आहे. 'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला पाहणे रंजक ठरणार आहे. ७ ते १४ या वयोगटातील मुले आपल्या आवाजाच्या जोरावर प्रशिक्षकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडतील असे एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर करताना झळकतील. या सुंदर सांगितिक सफरीमध्ये या छोट्या गायकांचे दोस्त बनून प्रसिद्ध अभिनेता व सूत्रसंचालक जय भानुशाली व त्याचा साथीदार निहार गिते हे दोघे या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. बडे मियां आणि छोटे मियां म्हणावे अशी त्यांची कामगिरीही आवर्जून पहावी अशीच असणार आहे.