Join us  

दिव्यांका त्रिपाठी लवकरच देणार गुड न्यूज, विवेक दहिया म्हणाला, हो ही न्यूज खरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 8:20 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पुन्हा एकदा प्रेग्नेंसीच्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दिव्यांकाचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती बेबी बंपमध्ये दिसत आहे. या फोटोत तिच्यासोबत तिचा नवरा विवेक दहिया रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे. 

दिव्यांका त्रिपाठी व तिचा नवरा विवेक दहिया यांनी नुकतीच टेली पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या सोहळ्यातील त्या दोघांच्या फोटोवरून खूप चर्चा होते. या फोटोचा खुलासा त्या दोघांनी केला आहे. विवेक म्हणाला की, अशी बातमी बाहेर कशी काय येते?

विवेकने पुढे सांगितले की, खरेतर तो एडिटेड फोटो नसून खरे आहे. आम्ही आता बेबी आत ठेवून आलो आहोत. बेबी बंप डिटेचिबल आहे. पोटात एक झिप लावली आहे. ही झिप ओपन करून आम्ही त्याला बाहेर काढतो आणि हवे तेव्हा आत ठेवतो. तर दिव्यांका म्हणाली, आम्ही एका व्हॉईस शोच्या सेटवर होतो. या फोटोला खूप चांगल्यारित्या एडिट केले आहे. खरेच लोकांकडे किती वेळ असतो.

विवेक आणि दिव्यांका ही जोडी दिवेक या नावाने लोकप्रिय आहे. हे दोघे ८ जुलै, २०१६मध्ये विवाहबंधनात अडकले. दिव्यांका सध्या ये है मोहबत्तें आणि एका वेबसीरिजच्या कामात व्यग्र आहे. तर विवेक कयामत की रात मालिकेत काम करतो आहे.  

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीविवेक दहिया