Join us  

"अमेरिका दौरा आधीच ठरला होता म्हणून..." विशाखाने मानले 'शुभविवाह' मालिकेच्या निर्मांत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 12:10 PM

'कुर्रर्रर्र' या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत सुरु असून विशाखा सध्या अमेरिकेत आहे.

मराठी कॉमेडी असो किंवा मालिकेतील खलनायिकेचं पात्र असो कोणत्याही भूमिका अतिशय उत्तमपणे निभावणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. 'कुर्रर्रर्र' या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत सुरु असून विशाखाही सध्या अमेरिकेत आहे. तर दुसरीकडे शुभविवाह या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. मालिकेत तिच्या पात्राची सगळी आठवण काढत आहेत. त्यामुळे विशाखाने मालिकेच्या मेकर्ससाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

विशाखा लिहिते,"Missing रागिणी..... शुभविवाह..! स्टारप्रवाह वर.. दुपारी दोन वाजता..! नव्या सिरीयल,नवीन भूमिकेतून,लगेचच इतका मोठा ब्रेक घेणं शक्य नसतं.. पण खूप आधीपासून ठरलेला हा दौरा..त्यामुळे ह्या तारखांना मी नसणार.. हे माहित असूनही इतकी महत्वाची भूमिका मला दिलीत... माझा हा दौरा तुम्ही adjust केलात.खरंच तुमचे मनापासून आभार.. स्टार प्रवाह आणि आमचे निर्माते महेश तागडे ह्यांचे ही आभार.रागिणी रंगवणं..जीव ओतून करते आणि करत राहीन."

विशाखाचा हा दौरा आधीच ठरल्याने तिला अमेरिकेला जाणं भाग होतं. तरी 'शुभविवाह' मालिकेत तिला महत्वाची भूमिका दिल्याने तिने निर्मात्यांचे आभार मानलेत. दरम्यान 'कुर्रर्रर्र' या मालिकेच्या दौऱ्यासाठी विशाखासोबत हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळ  हे देखील आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रा