Join us

"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:02 IST

"एवढी मेहनत जर गायनात घेतली असती तर...", काय म्हणाला विराटचा भाऊ?

गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) सतत क्रिकेटपटू विराट कोहलीवर (Virat Kohli) कमेंटवर करताना दिसतोय. दोन दिवसांपूर्वी त्याने विराटचे चाहते त्याच्यापेक्षा जास्त मोठे जोकर्स आहेत असं विधान केलं. यानंतर राहुलला बरंच ट्रोल करण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा त्याने विराटच्या चाहत्यांवर निशाणा साधत अप्रत्यक्षरित्या विराटशीच वैर घेतलं आहे. आरसीबीच्या ३ चाहत्यांना एका प्रकरणात अटक करण्यात आली. ही बातमी शेअर करत त्याने पुन्हा विराटच्या चाहत्यांना जोकर म्हटलं आहे. दरम्यान विराटच्या कोहलीच्या भावाने पोस्ट शेअर करत राहुल वैद्यला चांगलंच सुनावलं आहे.

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने (Vikas Kohli) सोशल मीडियावर लिहिले, "मुला, इतकी मेहनत जर तू गायनात घेतली तर स्वकष्टावर प्रसिद्ध होशील. सध्या संपूर्ण देश जी परिस्थिती आहे त्यारवर लक्ष देत आहे, तर इकडे विराटच्या नावाचा वापर करुन हा बावळट फॉलोअर्स वाढवण्याच्या आणि प्रसिद्ध होण्याच्या मिशनवर आहे. किती मोठा लूजर आहे."

काय आहे हा वाद?

राहुल वैद्यने काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर आपल्याला ब्लॉक केल्याचा खुलासा केला होता. यानंतर त्याने सतत विराटवर निशाणा साधला. अवनीत कौरचा फोटो लाईक करण्यावरुन विराट सध्या चर्चेत होता. यावर अनेक मीम्सही बनवले गेले. विराटला अखेर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. चाहत्यांनी यावर विराटला पाठिंबा दिला. मात्र राहुल वैद्यने विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर्स आहेत अशी पोस्ट केली. यानंतर सतत तो 'सारी उम्र मै जोकर...' हे गाणं गातोय. नुकतीच अशी बातमी आली की विराटच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टरसमोर बकरीचा बळी दिला. ही बातमी शेअर करत राहुलने पुन्हा चाहत्यांना 'दो कौडी के जोकर्स' असं म्हटलं आहे.

टॅग्स :राहुल वैद्यविराट कोहलीट्रोल